Marathi News> मनोरंजन
Advertisement

''मुलांमध्ये देशप्रेम रूजवण्यासाठी...'' स्वप्नील जोशीची पोस्ट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल!

Swapnil Joshi Instagram Post: स्वप्निल जोशी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याचं फॅन फॉलोईंगही (Swapnil Joshi News) प्रचंड आहे. परंतु स्वप्निलची एक पोस्ट सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. या पोस्टमध्ये स्वप्निलची पत्नी लीना आपल्या मुलांना एका खास ठिकाणी घेऊ गेली होती. ज्याच्याबद्दल स्वप्निलनं एक पोस्ट (Swapnil Joshi Viral Post) शेअर केली आहे. 

''मुलांमध्ये देशप्रेम रूजवण्यासाठी...'' स्वप्नील जोशीची पोस्ट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल!

Swapnil Joshi Instagram Post: अभिनेता स्वप्नील जोशी हा आपल्या दमदार अभिनयासाठी आणि हटके स्टाईलसाठी (Swapnil Joshi Instagram) ओळखला जातो. स्वप्निल जोशी हा इन्टाग्रामवरही सक्रिय असतो. तो चाहत्यांना आपल्या रोजच्या नव्या अपडेट्सही पुरवतं असतो. सध्या त्याची अशीच एक पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यानं आपल्या दोन्ही मुलांचे फोटो शेअर (Swapnil Joshi Children) केले आहेत. यात ते दोघं एका डिफेन्स एक्सीबिशनमध्ये सहभागी झाले होते. सध्या त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सही येताना दिसत आहेत. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या पोस्टमध्ये स्वप्निलनं (Swapnil Joshi Sunday With Kids) आपल्या पत्नीचे लिना यांचेही आभार मानले आहेत. स्वप्नीलच्या राघव आणि मायराचा देशभक्तीप्रती असलेला आदर या फोटोतून उमटताना दिसतो आहे. त्यामुळे दोन्ही मुलांचेही कौतुक करण्यात आले आहे. (swapnil joshi shares an instagram post his son and daughter participates in a defence exibhition fans praises)

स्वप्निल जोशी हा मराठीतला चॉकलेट बॉय आहे. सोशल मीडियावरही त्याचं खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे. तो आपल्या राघव आणि मायराचे अनेक व्हिडीओज हे सोशल मीडियाच्या इन्टाग्राम पेजवरून शेअर करत असतो. त्यांच्या या क्यूट व्हिडीओजना भरपूर लाईक्स येतात आणि हे व्हिडीओही प्रचंड व्हायरल होतात. सध्या स्वप्निलची अशी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहेत. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. स्वप्निल आपल्या आगामी चित्रपटांबद्दल तसेच आपल्या वेकेशन आणि फॅमिली टाईमबद्दलही इन्टाग्रामवर अपडे्टस शेअर करत असतो. 

या पोस्टमध्ये स्वप्निल कॅप्शमध्ये लिहिलंय की, रविवार मस्त गेला! नुकतीच मुलं ही डिफेन्स एक्झिबिशन पाहून घरी आली आहे. रविवारी दुपारी त्यांनी तिथे नेल्याबद्दल लीना तुझे आभार. ते घरी आल्यापासून प्रत्येक गोष्टीला जय हिंद म्हणताना दिसत आहेत. अजून काय पाहिजे! त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना रूजवण्याचे आणि त्यांना सैन्यातील जवानांच्या बलिदानाची आणि देशावरील प्रेमाची ओळख करून देण्याचे हेच योग्य वय आहे! खऱ्या आयुष्यातील हिरोंना पाहण्यापाहून ते सैन्याच्या टॅंकमध्ये बसण्यापर्यंत, ते त्यांच्याशी बांधले गेले आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे. जय हिंद!' सध्या स्वप्निलची ही पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्वप्निल जोशी हा मराठीतला सुपरस्टार अभिनेता आहे. चित्रपट, मालिका, नाटक आणि वेबसिरिज या सगळ्याच माध्यमांवर त्यानं उत्कृष्ट कामं केलं आहे. त्याचा 'वाळवी' हा चित्रपट यावर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद लाभला आहे. 

Read More