Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' खास व्यक्तीसोबत सुझैन खान कॅलिफोर्नियामध्ये घेतेय सुट्टीचा आनंद

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खानचं नाव नेहमी चर्चेत असतं.

'या' खास व्यक्तीसोबत  सुझैन खान कॅलिफोर्नियामध्ये घेतेय सुट्टीचा आनंद

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खानचं नाव नेहमी चर्चेत असतं. सध्या सुजैन खान सुट्टीसाठी बाहेर गेली आहे. सुझैन खान कॅलिफोर्नियामध्ये तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत एक व्यक्ती दिसत आहे. ज्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

कैलिफोर्नियामध्ये कोण आहे सुझैन खानसोबत
अलीकडेच सुझैन खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर कॅलिफोर्निया ट्रिपचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. एका व्हिडिओमध्ये सुजैन खान एका व्यक्तीसोबत हॉलिडे एन्जॉय करताना दिसत आहे.  या व्हिडिओमध्ये सुझानसोबत दिसणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी आहे. होय, सुझैन खान आणि अर्सलान आजकाल त्यांच्या मोकळ्या वेळेचा आनंद घेत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुझैन आणि अर्सलान बराच काळ एकमेकांसोबत आहेत
खरंतर, हिंदी चित्रपट अभिनेता आणि एक्स पती हृतिक रोशनपासून घटस्फोट घेतल्यानंतर, सुझैन खानची अर्सलान गोनीशी जवळीक वाढू लागली. गेल्या अनेक महिन्यांपासून सुझैन खान आणि अर्सलान गोनी सतत एकमेकांसोबत दिसत आहेत. ज्या अंतर्गत हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय बॉलीवूड निर्माता करण जोहरच्या बर्थडे बॅशमध्येही सुझैन आणि अर्सलान एकत्र दिसले होते.

Read More