Marathi News> मनोरंजन
Advertisement

सुशांतच्या बहिणीने ५ व्हिडिओ शेअर करून म्हटलं....

व्हिडिओ शेअर करत दिला आठवणींना उजाळा 

सुशांतच्या बहिणीने ५ व्हिडिओ शेअर करून म्हटलं....

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात ड्रग्स संदर्भातील आरोपात अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात एनसीबीने १० जणांना ताब्यात घेतलं आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही जामीन मिळालेली नाही. रिया भायखाळा कारागृहात असून २२ सप्टेंबरपर्यंत तिथेच असेल. अशा परिस्थितीत सुशांतच्या बहिणीने काही व्हिडिओ शेअर केले आहेत. 

सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती (Shweta Singh Kirti) ने इंस्टाग्रामवर फोटो अपलोड केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

What A Heartwarming Smile 

A post shared by Shweta Singh kirti (@shwetasinghkirti) on

व्हिडिओत पाहू शकतो की, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि राजकुमार रावसोबत एक मुलाखत देत आहे. व्हिडिओत पाहू शकतो की, सुशांत यामध्ये कसा मस्ती करत आहे. राजकुमार रावच्या गोष्टी ऐकून सुशांत खूप हसत आहे.

'एक दिलकश स्माइल' म्हणतं श्वेताने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर खूप चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. १४ जून रोजी वयाच्या ३४ व्या वर्षी सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केली.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीसोबतच १६ जणांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशी सत्रामध्ये अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि डिझायनर सिमोन खंबाटा यांची नावं घेतली आहेत.

Read More