Marathi News> मनोरंजन
Advertisement

"मुलांना भारतीय शाळेत शिकवायचेच नव्हते...", Sunil Shetty चा मोठा खुलासा

Sunil Shetty : सुनील शेट्टीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मुलांना भारतीय शाळेत का शिकवायचे नव्हते त्याविषयी सांगितलं आहे. त्याच्या या निर्णयामुळे काय बदल झाला याविषयी सांगत त्यानं अथियानं अचानक अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णयाविषयी देखील सांगितले. 

Sunil Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या कामासोबत त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. सुनील त्याच्या मुलांविषयी अनेक गोष्ट स्पष्टपणे सांगताना दिसतो. त्याची दोन्ही मुलं ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सुनील शेट्टीला त्याच्या मुलांना भारताती शाळेत शिकवायचे नव्हते. याविषयी त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. अमेरिकेतील शाळेत मुलांना शिकवण्यासाठी खूप पैसे लागतात याविषयी त्याच्या वडिलांनी त्याला आधीच सांगितले होते. त्यानंतर लेक अथियानं अटलांटाच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर चित्रपटसृष्टीत करिअर करण्याविषयी सांगितल्याचे देखील या मुलाखतीत सांगितलं. 

सुनील शेट्टीनं ही मुलाखत निखिल कामतला दिली होती. या मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील करिअरच्या सुरुवातीच स्ट्रगल आणि कुटुंबातील अनेक गोष्टींविषयी केला खुलासा. "मी आधीच ठरवलं होतं की मी माझ्या मुलांना भारतातील शाळेत शिकवणार नाही. मला माझ्या मुलांना अमेरिकेच्या बोर्डच्या शाळेत शिकवायचे होते. शाळेत शिकवणारी फॅकल्टी ही अमेरिकन असावी अशीच माझी इच्छा होती. त्याच कारण एक होतं की माझ्या मुलांना स्पेशल वाटेल किंवा त्यांना स्पेशल वागणूक दिली जावी कारण ते सेलिब्रिटीची मुलं आहेत किंवा ते कोणाची मुलं आहेत हे सांगितलं जावे, अशी माझी इच्छा नव्हती. मला त्यांना असं जग दाखवायचं होतं जिथे ते कोण आहेत यानं काहीही फरक पडत नाही. मला वाटतं की त्याचा फायदा झाला. मला आठवण आहे की माझी वडील मला सांगायचे की त्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे अथिया विषयी सांगत सुनील शेट्टी म्हणाला," आम्ही अथियाच्या अॅडमिशसाठी अटलांटा गेलो होतो आणि तिथे आम्ही कॉलेज पाहिलं. सगळं झालं आणि तिला ते कॉलेज आवडलं देखील होतं. अॅडमिशन घेतल्यानंतर जेव्हा ते परत येत होते तेव्हा अथियानं मला विमानतळावर सांगितलं की बाबा, मला हे करून आनंद होत नाही आहे. मग मी तिला विचारलं की तुला काय करायचं आहे. त्यावर अथिया मला म्हणाली की मला चित्रपटसृष्टीत काम करायचं आहे. मी म्हटलं की ही चांगली गोष्ट आहे पण तू तुझ्या अपयशाचा सामना करू शकशील? कारण त्यानं खूप तणाव येतो. कारण हा तणाव प्रत्येक शुक्रवारी माझा जीव घेतो आणि त्यानं मला त्रास होता दुसरं काही नाही."

हेही वाचा : 'नमक हलाल' फेम अभिनेता Harish Magon यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन

सुनील शेट्टीच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर 1992 साली प्रदर्शित झालेल्या 'बलवान' या चित्रपटातून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पण त्याला खरी लोकप्रियता ही 1994 साली प्रदर्शित झालेल्या 'मोहरा' या चित्रपटातून मिळाली होती. त्याच वर्षी 'गोपी किशन' हा त्याचा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तर आता सुनीलनं 'हंटर: टूटेगा नहीं, तोडेगा' या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं आहे.

Read More