Marathi News> मनोरंजन
Advertisement

'भारत'मध्ये भुमिका मिळवण्यासाठी सुनील ग्रोव्हरचा खास ऑडिशन व्हिडिओ

देसी गर्ल प्रियांका चोप्राने अली अब्बास जफरचा 'भारत' हा सिनेमा सोडला आहे.

'भारत'मध्ये भुमिका मिळवण्यासाठी सुनील ग्रोव्हरचा खास ऑडिशन व्हिडिओ

मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्राने अली अब्बास जफरचा 'भारत' हा सिनेमा सोडला आहे. 'भारत' या सिनेमापासून प्रियांका तिच्या वैयक्तिक कारणामुळे दूर गेली आहे, अशा आशयाचं ट्विट करत अली अब्बास जफरने त्याबाबत माहिती दिली आहे.  

प्रियांका चोप्राची 'भारत'मधून एक्झिट झाल्यानंतर आता नवी अभिनेत्री कोण? हा प्रश्न चर्चेत आला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री कॅटरिना कैफ या चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.  

सुनील ग्रोव्हरचा खास व्हिडिओ 

सुनील ग्रोव्हरने 'भारत' चित्रपटासाठी नव्या अभिनेत्रीचा शोध सुरू असल्याचं कळताच एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. सुनील ग्रोव्हरने अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी खास अंदाजात ऑडिशन दिले आहे. सोबतच 'किती % भारतीयांना मी 'भारत'च्या अभिनेत्रीच्या भूमिकेत असावं' असं वाटतं सांगा? असा प्रश्नही विचारला आहे.  

 

कोरियन चित्रपटाचा रिमेक 

'भारत' हा कोरियन सिनेमा ‘ऑड टू माई फादर’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. तर दिशा पटनी आणि नोरा फतेही देखील झळकणार असल्याची चर्चा आहे. 

Read More