Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहरूख खानच्या मुलीला लाँच करणार हा दिग्दर्शक

कोण आहे हा दिग्दर्शक 

शाहरूख खानच्या मुलीला लाँच करणार हा दिग्दर्शक

मुंबई : शाहरूख खानने खूप अगोदरच सांगितलं आहे की, त्याच्या मुलीला सुहानाला अभिनय करायचाय. तिच्या या निर्णयामुळे किंग खान खूप खूष आहे. शाहरूख अभिनेत्री म्हणून सुहानाला लाँच करण्याबाबत खूप उत्सुक असताना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. 2019 मध्ये सुहाना बॉलिवूडमध्ये लाँच होत आहे. 

कायमच शाहरूख सुहानासोबतचे फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याने 'झिरो'च्या सेटवरील फोटो शेअर केला होता. त्यावर त्याने लिहिलं होतं की, 'मेरे नाम तू' या गाण्याला समझून घेण्यासाठी सुहानाने माझी मदत केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Suhana khan (@suhana_khan_officiall) on

तसेच आता सुहाना आणि तिच्या मित्रांनी केलेल्या एका शॉर्ट फिल्मची चर्चा होत आहे. त्याचे फोटो देखील समोर आले आहेत. या सगळ्या गोष्टींवरून हेच स्पष्ट होतं की, सुहानाच्या करिअरबाबत शाहरूख अतिशय सतर्क आहे. शाहरूख जरी स्वतःच्या सिनेमांमध्ये जरी बिझी असला तरीही त्याच लक्ष हे सुहानाकडे आहे.

करण जोहर आणि रोहित शेट्टीने सुहानाला लाँच करण्याबाबत उत्सुकता दाखवली मात्र तिला मसाला सिनेमांमधून डेब्यू करायचा नाही. पण आता असं कळतंय की, शाहरूखने सुहानाला लाँच करण्याची जबाबदारी ही संजय लीला भन्साळी यांच्या खांद्यावर टाकली आहे. शाहरूखने भन्साळी यांना सांगितलं की, ते तिच्यासाठी काही खास शोधतील आणि भन्साळींनी देखील हा शब्द पाळला आहे.

त्यामुळे आता संजय लीला भन्साळीच्या सिनेमातील सुहानाला पाहण्यासाठी शाहरूखबरोबरच सर्व चाहते देखील उत्सुक आहेत. 

Read More