Marathi News> मनोरंजन
Advertisement

Photo : सुहाना खानच्या मादक अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Suhana Khan Bold Photoshoot : सुहाना खाननं नुकतंच एक फोटो शूट केलं असून त्यातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Photo : सुहाना खानच्या मादक अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Suhana Khan Bold Photoshoot : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान ही चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. तिचा फॅशन सेन्स आणि तिची दुसऱ्यांविषयी असलेला आदर हा नेहमीच चर्चेत असतो. सुहाना अजून मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही. पण तिची फॅन फॉलोइंग ही कोणत्याही लोकप्रिय अभिनेत्रीपैक्षा कमी नाही. सोशल मीडियावर सक्रिय असलेली सुहाना ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच तिनं तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषयी ठरत आहे. 

सुहाना खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुहानानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा बोल्ड लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा फोटो शेअर करत सुहानानं ब्लॅक हार्ट इमोजी शेअर केलं आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केल्या आहेत. या शिवाय तिच्या मादक अदानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुहाना खानच्या या फोटोवर फक्त चाहते नाही तर सेलिब्रिटींनी देखील रिअॅक्शन दिली आहे. तिची बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेनं उफ्फ अशी कमेंट केली आहे. तर शनाया कपूरची आई महीप कपूर, अनन्याची आई, रोहन श्रेष्ठा आणि ओरी (ओरहान) पर्यंत अनेकांनी सुहानाची सगळ्यांनी स्तुती केली आहे. चाहत्यांना सुहानाचा हा लूक फार आवडला आणि शाहरुख खानच्या लाडक्या लेकीवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

हेही वाचा : 'ब्रूटल आणि वायलेंट ऑफिसर' दीपिकाचा सिंघम अवतार! फोटो तुफान व्हायरल

सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटात ती दिसणार आहे. यावेळी तिच्यासोबतच खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा देखील त्यांच्या पदार्पणाची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिकस या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून एकावेळी अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. आर्ची, बेट्टी, डिल्टन, इथर, जुग हेड, रेगी आणि वेरोनिका ही मुख्य पात्रे आहेत. या चित्रपटाची कथा हायस्कूलच्या लव्ह ट्रँगल ड्रामावर आधारित आहे. 'द आर्चीज' चित्रपटात सुहाना खान 'वेरोनिका'ची भूमिका साकारत आहे, खुशी कपूर 'बेटी'ची भूमिका साकारत आहे आणि अगस्त्य नंदा 'आर्चिज'ची भूमिका साकारत आहे.

Read More