Marathi News> मनोरंजन
Advertisement

'स्टुडन्ट ऑफ द इयर २' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

 'स्टुडन्ट ऑफ द इयर २'च्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. 

'स्टुडन्ट ऑफ द इयर २' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे स्टारर बहुचर्चित 'स्टुडन्ट ऑफ द इयर २' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'स्टुडन्ट ऑफ द इयर २' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता होती. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पाच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'स्टुडन्ट ऑफ द इयर २' चित्रपटाचा ३ मिनिटं ५ सेकंदचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये टीन एजर्सच्या इमोशन, अॅक्शन, रोमांसचा तडका पाहयला मिळत आहे. अनन्या पांडे, तारा सुतारिया पहिल्यांदाच या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे यांच्यासह पुनीत मल्होत्राही जबरदस्त भूमिकेत दिसत आहे. 

fallbacks

'स्टुडन्ट ऑफ द इयर २' चित्रपटाची कथा टायगर श्रॉफ स्वत:ला सिद्ध करण्याच्या तसंच स्टुडन्ट ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकण्याजवळपास फिरत आहे. चित्रपटात तारा सुतारिया आणि अनन्या पांडे त्यांच्या लूक्सपासून ते त्यांच्या भूमिकेपर्यंत दोघींनीही एकमेकींना चांगलीच टक्कर दिली आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेलं कॅम्पस शाळा किंवा कॉलेजपेक्षा एखादा स्पोर्ट्स क्लब, डान्स क्लब किंवा फॅशन इंन्स्टिट्यूटसारखा दिसत आहे. परंतु 'स्टुडन्ट ऑफ द इयर २'च्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. 

fallbacks

'स्टुडन्ट ऑफ द इयर २' चित्रपट येत्या १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 'स्टुडन्ट ऑफ द इयर २' चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झालेल्या 'स्टुडन्ट ऑफ द इयर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्दार्थ मल्होत्रा यांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पुनीत मल्होत्राने चित्रपटाचं दिग्दर्शिन केलं असून करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शन बॅनरअंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 

Read More