Marathi News> मनोरंजन
Advertisement

अक्षय कुमार झाला जखमी? नेमकं काय झालं तुम्हीच पाहा व्हिडिओ

बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

अक्षय कुमार झाला जखमी? नेमकं काय झालं तुम्हीच पाहा व्हिडिओ

मुंबई : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय जमिनीवर पडताना दिसत आहे. आणि गुडघे टेकून वेदना झाल्यामुळे जोरजोरात ओरडताना दिसत आहे. अक्षयने स्वत: हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण अक्षयला नेमकं झालंय तरी काय? हे आज हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

खरं तर, अक्षयने इंस्टाग्रामवर जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने जबरदस्त एक्टिंग केली आहे. व्हिडिओमध्ये, अक्षय कुमार एका काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये चालत कॅमेराकडे येताना दिसत आहे आणि चालता चालता तो खाली कोसळतो आणि खाली घसरुन पडल्यानंतर अक्षय गुडघे टेकून वेदना झाल्या म्हणून ओरडू लागतो.

या व्हिडिओमध्ये अक्षय केवळ अभिनय करीत आहे. या व्हिडिओद्वारे अक्षय नुकत्याच रिलीज झालेल्या 'फिलहाल' गाण्याचं प्रमोशन करत आहे आणि या गाण्यावर तो एक्टिंग करताना दिसत आहे.  हा व्हिडिओ शेअर करत अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'जे प्रेम तुम्हाला हसवतं तेच प्रेम तुम्हाला रडवतं ही,...'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अक्षयचे आगामी चित्रपट
लवकरच अक्षय 'रक्षाबंधन', 'बेल बॉटम', 'सूर्यवंशी', 'बच्चन' पांडे', 'राम सेतू',या चित्रपटांमध्ये  दिसणार आहे.

Read More