Marathi News> मनोरंजन
Advertisement

SRK दिसला 'त्या' लुकमध्ये... थेट लंडनमधून लुक झाला व्हायरल; पाहा व्हिडीओ

आर्यन खानला क्लिन चीट मिळाल्याने शाहरूख शांतेत आयुष्य जगत असल्याचे पाहायला मिळते आहे. 

SRK दिसला 'त्या' लुकमध्ये... थेट लंडनमधून लुक झाला व्हायरल; पाहा व्हिडीओ

मुंबईः आर्यन खान ड्रग्ज केसमुळे मीडिया आणि चाहत्यांपासून अलिप्त राहिलेला आणि त्या काळात प्रचंड टेंशनमध्ये असलेला बॉलीवूडचा महानायक शाहरूख खान लवकरच रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'पठाण'मधून तो बीग स्क्रीनवर कमबॅक करतो आहे. 

सध्या स्क्रीन आणि मीडियातून गायब झालेला शाहरूख हळूहळू का होईना पण लोकांसमोर येतो आहे. आर्यन खानला क्लिन चीट मिळाल्याने शाहरूख शांतेत आयुष्य जगत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्याचा 'पठाण'मधला लुक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आणि त्यातून त्या पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याचसोबत त्याचा 'जवान'मधला लुकही व्हायरल झाला आहे. 

'पठाण' आणि 'जवान' या दोन्ही लुकनंतर शाहरूखने चाहत्यांना आनंदीत करून सोडले आहेच पण आता शाहरूखच्या चाहत्यांसाठी आता अजून एक मोठी बातमी आहे. शाहरूख खान आता लवकरच राजकुमार हिरानीच्या 'डंकी' या चित्रपटातही दिसणार आहे. आमीर खाननंतर आता राजकूमार हिरानी शाहरूख सोबत काम करतो आहे त्याचसोबत शाहरूख खानचा हा राजकूमारी हिरानीसोबतचा पहिलाच चित्रपट आहे. 

नुकताच शाहरूख 'डंकी'च्या लंडन येथील सेटवर स्पॉट झाला आहे. त्याचा एक वेगळ्या लुकमधील व्हीडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाची आतिषबाजी केली आहे. शाहरूखने गंघम शर्ट आणि जड स्टबल घातला आहे. SRK लंडनमध्ये एका नदीकाठी शूटिंग करताना दिसला.

'डंकी'ची टीम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात परतणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर शाहरुख खान पंजाबमध्ये 'डंकी' चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. असे बोलले जाते आहे की तो याच चित्रपटातील एका गाण्याचे शुटिंग पंजाबमध्ये करणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' हा एक इमिग्रेशन ड्रामा असल्याचं म्हटलं जातं. 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार्‍या या चित्रपटात तापसी पन्नूसोबत SRK मुख्य भूमिकेत आहे.

'पठाण' 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे तर एसआरकेचा अॅटलीसोबतचा 'जवान' 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचसोबत शाहरूखच्या मुलीचाही पहिला पिक्चर 2023 मध्येच रिलीज होणार आहे तेव्हा एकूण पुढचे वर्ष हे खान परिवाराचे राहणार आहे. 

Read More