Marathi News> मनोरंजन
Advertisement

''...नकारात्मकता पसरवू नका'' दत्तक घेतलेल्या मुलीची गुड न्यूज देत अभिनेत्रीनं नेटकऱ्यांना सुनावलं

Actress Abhirami Adopted Daughter: सध्या सेलिब्रेटी आपल्या फॅमिलीत येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनाची गुड न्यूज देताना दिसत आहेत. सोबतच आता अशाच एका दाक्षिणात्त्य (South Indian Actress Adoprs Baby Girl) अभिनेत्रीनं आपण दत्तक घेतलेल्या मुलीचं नाव आणि फोटो शेअर केला आहे. मदर्स डेला (Mother's Day) अभिनेत्री ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. 

''...नकारात्मकता पसरवू नका'' दत्तक घेतलेल्या मुलीची गुड न्यूज देत अभिनेत्रीनं नेटकऱ्यांना सुनावलं

Actress Abhirami Adopted Daughter: सध्या मनोरंजनविश्वातील कलाकार हे आपल्या घरात आलेल्या नव्या पाहुण्यांबद्दल गुडन्यूज देताना दिसत आहेत. काही अभिनेत्रींनी आपल्या प्रेग्नंन्सीची (Pregnancy News in Bollywood) घोषणा केली आहे. त्यात आता अशाच एका दाक्षिणात्त्य अभिनेत्रीची (South Indian Actress Post) पोस्ट चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीच्या घरात एक नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे परंतु एक लहानशी गोंडस मुलगी दत्तक घेतल्याची घोषणी तिनं केली आहे. त्यामुळे सध्या तिचीच चर्चा आहे.

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनंही दोन मुलींना 24 वर्षांपुर्वी दत्तक घेतले असून आज ती सिंगल पेरेंट असली तरी त्या दोघींचा संपुर्ण सांभाळ करते आहे. यासाठी सुष्मिताचेही अनेकदा कौतुक करण्यात आले आहे.दाक्षिणात्त्य अभिनेत्री अभिरामी हिनं एका गोंडस मुलीला दत्तक घेतले आहे. याबद्दल तिनं एक पोस्ट इन्टाग्रामवर शेअर केली असून चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. (south indian actress shares an post on adopting a baby girl kalki own turns 1)

या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतल्या अनेक दिग्गज कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आपल्या मुलीचे फोटो तिनं पहिल्यांदा चाहत्यांसोबत शेअर केले आहेत परंतु यावेळी तिनं आपल्या मुलीचा संपुर्ण फोटो टाकलेला नाही. तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये मुलीचा चेहरा हार्ट इमोजीनं लपवला आहे. या मुलीचे नावं कलकी असे ठेवले असून (South Indian Actress Abhirami Adopts Kalki) ती आता 1 वर्षांची झाली आहे. 

हेही वाचा - ''डास अन् प्रचंड उकाडा; AC नाही त्यात प्रेक्षकांचा गोंधळ...'' वैभव मांगलेंच्या पोस्टमुळे नाट्यगृहातील गैरसोय पुन्हा चर्चेत!

मातृदिनाच्या निमित्तानं अभिनेत्रीची पोस्ट

इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना (Abhirami and Rahul) तिनं म्हटलं आहे की, प्रिय मित्रांनो, राहुल आणि मी एका गोंडस मुलीचे पालक झालो आहोत हे सांगताना तुम्हाला अतिशय आनंद होतो आहे. तिचं नावं आहे कलकी! आम्ही तिला मागील वर्षी दत्तक घतले असून आमच्यासाठी हा अनुभव फार लाईक चेन्जिंग राहिला आहे. आज मातृदिन आहे. त्यादिवशी ही गोड बातमी सांगत हा दिवस साजरा करणं माझ्यासाठी खूपच आनंददायी आहे. मला आणि माझ्या परिवाराला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे कारण आज आम्ही एका नव्या पर्वाची सुरूवात करत आहोत.

ही पोस्ट शेअर (Abhirami Mother's Day Post) करत असताना तिनं खाली टीप लिहिली आहे ज्यात ती म्हणते की, कृपया कुठल्याही नकारात्मक प्रतिक्रिया उमटवू नका. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे अभिरामी? 

39 वर्षीय अभिरामी हिचं मुळ नावं दिव्या गोपीकुमार असं आहे. तिनं तामिळ, तेलूगु चित्रपटांमध्ये आणि मालिकांमधून कामं केली आहे. सध्या तिच्या या पोस्टवर सगळ्यांच्याच कमेंट्स येताना दिसत आहेत. आतापर्यंत तिच्या या पोस्टला लाखो चाहत्यांनी लाईक केले आहे. 

Read More