Marathi News> मनोरंजन
Advertisement

Rashmika Mandanna मुळे आईला धडकी; हातात जे होतं ते पाहून हादरली

रश्मिकाच्या आईच्या जीवाला घोर   

Rashmika Mandanna मुळे आईला धडकी; हातात जे होतं ते पाहून हादरली

मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदानानं 2016 मध्ये चित्रपट वर्तुळात पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंतच्या 6 वर्षांमध्ये तिच्या प्रसिद्धीचा आलेख चांगलाच वर गेला. फार कमी वेळात रश्मिकानं चाहत्यांच्या मोठ्या वर्गाला भुरळ पाडली. त्यातच 'पुष्पा: द राइज' चित्रपटामुळे तर ती देशविदेशातही बरीच लोकप्रिय झाली. 

आजच्या घडीला रश्मिका कोट्यवधींची कमाई करत आहे. पण, आपल्या लेकिला कमी वयातच मिळालेलं लाखोंचं मानधन पाहून तिची आई मात्र हादरली होती. एका मुलाखतीत खुद्द रश्मिकानंच यासंदर्भातला खुलासा केला. 

योगायोगानं  तिनं मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं आणि इथूनच तिला अभिनय कारकिर्दीसाठीची दारं खुली झाली. पहिला चित्रपट स्वीकारला तेव्हा तिनं घरी याची कल्पना कोणालाही दिली नव्हती. पण, हातात जेव्हा पहिल्यांदाच दीड लाख रुपयांचा चेक आला तेव्हा मात्र याचं करावं तरी काय हेच तिला कळेना. (South indian actress Rashmika Mandanna first Salary cheque )

अखेर घरी जाऊन रश्मिकानं तो चेक आईच्या हातात दिला. मुलीच्या हातात इतकी रक्कम असणारा चेक पाहून आईला हादरा बसला. तेव्हा कुठे रश्मिकानं आपल्याला अभिनेत्री व्हायचंय, असं आईला सांगितलं. 

आईला हा धक्का पचवण्यासाठी वेळ गेला असतानाच रश्मिकाचे वडील मात्र प्रचंड आनंदात होते. कारण, अभिनेता होण्याचं स्वप्न तेसुद्धा पाहत होते. चित्रपटांची विशेष आवड असणाऱ्या रश्मिकाच्या वडिलांना जेव्हा आपल्या लेकिची ही आवड कळली तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला. 

कुटुंबाच्या पाठिंब्यासह रश्मिचा तिच्या कारकिर्दीत यशशिखरं चढू लागली. येत्या काळात ती, 'मिशन मजनू'शिवाय 'गुड बाय' आणि 'अॅनिमल' या चित्रपटांतून झळकणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, रणबीर कपूर या बॉलिवूड कलाकारांसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळं चाहत्यांसाठी ही परवणीच असेल. 

Read More