Marathi News> मनोरंजन
Advertisement

आता माझी बारी आली... 'हा' अभिनेता निवडणुकांच्या रणांगणात उतरण्यास सज्ज

अभिनय विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या या अभिनेत्याची नवी इनिंग... 

आता माझी बारी आली... 'हा' अभिनेता निवडणुकांच्या रणांगणात उतरण्यास सज्ज

मुंबई : अभिनय विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणारे अभिनेते प्रकाश राज हे आता राजकारणातही चांगलेच सक्रिय झाले आहेत. येत्या लोकसभा निवडणूकांसाठी जिथे मोठमोठे राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत तेथेच प्रकाश राज यांनीही या रणसंग्रामात उडी घेतल्याचं कळत आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून खुद्द राज यांनीच याविषयीची माहिती दिली. २०१८ हे वर्ष संपून घड्याळात बाराचा ठोका पडताच त्यांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्या देत ही बाब जाहीर केली. 

'नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. ही आहे एक नवी सुरुवात... नवी जबाबदारी...', असं लिहित तुम्हा सर्वांच्याच पाठिंब्याचा आधार घेत आपण येत्या लोकसभा निवडणूकांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. 

राज यांनी ते नेमके कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार, .यावरुन मात्र पडदा उचललेला नाही. पण, अबकी बार जनता की सरकार, अशा सूचक विधानाचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. त्यामुळे आता अपक्ष मेदवार म्हणून त्यांना नेमकं कोणत्या मतदार संघाचं तिकीट मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

कर्नाटक निवडणूकांणध्ये प्रकाश राज यांनी प्रचारकार्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. Just Asking ही चळवळ सुरू करुन त्याअंतर्गत त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्यांना एक व्यसपीठ मिळवून दिलं होतं. 

fallbacks

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारविरोधी भूमिकेसाठीही ते ओळखले जातात. कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देणाऱ्या या अभिनेत्याच्या भाजपविरोधी भूमिकेमुळेच त्यांला बॉलिवूडमध्ये फार चित्रपटांचे प्रस्ताव येत नसल्याचं खुद्द राज यांचच म्हणणं आहे. त्यामुळे आपली ठाम आणि परखड मतं, भूमिका मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याच्या वाट्याला नेमका कोणता मतदार संघ येतो आणि त्या मतदार संघात ते यशस्वी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

Read More