Marathi News> मनोरंजन
Advertisement

कोट्यवधींचं मानधन घेणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती पैसे भरतो माहितीये?

Prabhas London House Rent : कलाकार मंडळी आणि त्यांची घरं याबाबत कायमच चाहत्यांना कुतूहल असतं. अशा या कलाकार मंडळींमधील एक नाव आहे अभिनेता प्रभासचं.   

कोट्यवधींचं मानधन घेणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती पैसे भरतो माहितीये?

Prabhas London House Rent : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रचंड प्रसिद्धीझोतात असणाऱ्या अभिनेता प्रभास यानं त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत कमालीची लोकप्रियता मिळवली. मुळात दाक्षिणात्य कलाकार हे त्यांच्या चित्रपटांसोबतच आणखी एका कारणासाठीसुद्धा चर्चेत असतात. ते म्हणजे त्यांची श्रीमंती. गडगंज श्रीमंती असणाऱ्या या कलाकार मंडळींची जीवनशैलीसुद्धा तितकीच कमाल असते आणि अभिनेता प्रभासही यास अपवाद नाही. 

सध्या अभिनेता प्रभास 'कल्की 2898 AD' या त्याच्या आगामी चित्रपटामुळं चर्चेचा विषय ठरत आहे. आता बिग बजेट चित्रपट म्हटलं म्हणजे तगडं मानधन आलं आणि जगडं मानधन म्हणजे प्रभासचा वाढता खर्चही आलाच. तुम्हाला माहितीये का, सध्या प्रभासच्या या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये सुरु असून, तिथंच त्यानं एक घर भाड्यानं घेतलं आहे, जिथं तो चित्रीकरणानंतर आरामासाठी येतो. 

हेसुद्धा वाचा : आयुष्यात हे जमलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं; नारायण मूर्ती आणि कुटुंबीयांचा साधेपणा पाहून सगळे भारावले 

सूत्रांच्या माहितीनुसार प्रभासनं भाडे तत्त्वावर घेतलेलं हे घर एखाद्या आलिशान हॉटेलमधील रुमहून कमी नाही. इथं राहण्यासाठी तो महिन्याला भारतीय चलनानुसार 60 लाख रुपये मोजतो. डोकं भणभणलं ना? या किमतीत एखाद्या व्यक्तीला 1 बीएचके फ्लॅट सहजपणे खरेदी करता येईल असंच तुमच्याही मनात आलं ना? 

प्रभासची जीवनशैली... 

प्रभास मुळातच आलिशान आयुष्य जगतो. हैदराबाद येथे तो 65 कोटी रुपयांच्या घरात राहतो. त्याच्या वार्षिक उत्पन्नाविषयी सांगावं तर, ते आहे 215 कोटी रुपये. त्याला महागड्या कारचीही विशेष आवड आहे. सध्याच्या घडीला या अभिनेत्याकडे रेंज रोवर स्पोर्ट्स, ऑडी A6, बीएमडब्ल्यू 7 सीरीज अशा कोट्यवधींची किंमत असणाऱ्या कार आहेत. 

राहिला प्रश्न प्रभासच्या आगामी चित्रपटांचा तर, त्याचं नाव अनेक चित्रपटांशी जोडलं जात आहे. 'सालार'ला मिळालेल्या यशानंतर आता अभिनेता 'कल्की 2898 AD'तून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मे महिन्यापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. याशिवाय तो 'प्रोजेक्ट के'मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यावतिरिक्त तो 'राजा डीलक्स' नावाच्या एका विनोदी भयपटामध्येसुद्धा झळकणार आहे. 

Read More