Marathi News> मनोरंजन
Advertisement

सर्वात मोठ्या सेलिब्रिटी कुटुंबात वादळ; मुलगा- सून विभक्त, घटस्फोटाच्या तयारीत?

एकमेकांची साथ आणि त्या वचनांचं काय? 

सर्वात मोठ्या सेलिब्रिटी कुटुंबात वादळ; मुलगा- सून विभक्त, घटस्फोटाच्या तयारीत?

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून चित्रपट जगतातील अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्या प्रतिष्ठित अशा कुटुंबात वादळ आल्याचं पाहायला मिळालं. या वादळामध्ये कुटुंबातील अत्यंत गोड संसारात मीठाचा खडा पडला आणि पाहता पाहता आता थेट त्यांचा घटस्फोट होत असल्याच्याच चर्चा समोर आल्या. 

अतिशय प्रसिद्ध अशा या कुटुंबातील जोडी आता विभक्त झाल्याचं म्हटलं जात आहे. ही जोडी म्हणजे समंथा अक्किनेनी आणि नाग चैतन्य, समंथा तिच्या पतीपासून वेगळी होणार असल्याच्या चर्चांनी बऱ्याच दिवसांपासून जोर धरला होता. ज्यानंतर आता म्हणजे ही जोडी वेगळी राहत असून येत्या काळात त्यांच्या घटस्फोटाची घोषणा करण्यात येईल. 

समंथा आणि तिचा पती, नाग चैतन्य यांनी या नात्याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नसलं तरीही न्यायालयात यासाठीचा कागदोपत्री व्यवहार सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार परस्पर एकमताने ही जोडी वेगळं होण्याच्या निर्णयावर पोहोचली आहे. असं असलं तरीही घटस्फोटास न्यायालयाची मान्यता मिळण्यासाठी ठराविक कालावधी द्यावा लागतो. ज्यामुळं घटस्फोटाच्या बातमीबाबत सध्यातरी या जोडीनं बरीच गोपनियता पाळल्याचं दिसून येत आहे. 

सध्या समंथा गोवा आणि चेन्नई इथं दिसली होती. नागचैतन्यपासून दूर राहण्यासाठीच ती हे करत असल्याचं म्हटलं गेलं. पण, आता जोवर याबाबत खुद्द समंथा आणि नाग चैतन्य काही वक्तव्य करत नाहीत, तोवर मात्र त्यांच्या नात्यावर साऱ्यांच्याच नजरा टिकल्या असतील.  

Read More