Marathi News> मनोरंजन
Advertisement

सोनू सूदच्या नावाने मटॉन शॉप, अभिनेत्याने व्हीडिओ शेअर करत लिहिले - "मी शाकाहारी आहे, पण…"

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आजकाल सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव आहे. सोनू सूद कोरोना व्हायरस ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी सर्व शक्य मार्गाने त्यांना मदत करत आहे.

सोनू सूदच्या नावाने मटॉन शॉप, अभिनेत्याने व्हीडिओ शेअर करत लिहिले -

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आजकाल सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव आहे. सोनू सूद कोरोना व्हायरस ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी सर्व शक्य मार्गाने त्यांना मदत करत आहे. मात्र, सोशल मीडियावर सोनू सूदकडे मदत मागणार्‍या लोकांसह काही असे मॅसेज येत आहेत, जे थोडे विचित्र आहेत. यामध्ये एका मुलीने केलेला मॅसेज तर खूपच मजेदार आणि आश्चर्यकारक आहे. कारण या मुलीने ट्वीटरद्वारे सोनू सूदकडून बॉयफ्रेंड मिळवून देण्य़ाची मागणी केली आहे. यानंतर सोनू सूदला रविवारी आणखी एक आश्चर्यचकीत करणारा मॅसेज आला. ज्यामध्ये सोनू सूदला त्याच्या नावाचे एक मटणाचे दुकान असल्याचे समजले.

रविवारी तेलुगू वृत्ताच्या व्हीडिओमध्ये सोनू सूदने आपल्या प्रतिसादामध्ये सांगितले की, तेलांगणाच्या करीमनगरमध्ये असलेल्या मटणाच्या दुकानाचे नाव हे सोनू सूदच्या नावावर आहे. ट्वीटरवर या बातमीला मजेदार पद्धतीने प्रतिक्रिया देताना अभिनेत्याने लिहिले की, "मी शाकाहारी आहे आणि माझ्या नावावर मटणाचे दुकान आहे? मी याला शाकाहारी दुकान उघडण्यास मदत करू शकतो का? "

सोनू सूदची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंत केली जात आहे. त्याला उत्तर देताना एका यूझर्सने लिहिले - "भाऊ, जिथे किंमत 700 रुपये किलो आहे, तिथे दुकानातील मालक मटण 650 रुपये प्रति किलोला विकत आहे. तसेच त्याने तुमच्या फाउंडेशनला प्रति किलो 50 रुपये देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत आणि आम्ही तुमचे समर्थन करतो."

कोविड 19च्या दुसर्‍या लाटे दरम्यान अभिनेता सोनू कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन कन्स्ट्रक्टर आणि इतर आवश्यक उपकरणांची व्यवस्था देखील करत आहेत. सोनूने नुकतीच सोशल मीडियावर घोषणा केली की, जूनमध्ये तो आंध्र प्रदेशमध्ये काही ऑक्सिजन प्लांट्स स्थापित करणार आहे.

सोनू सूद म्हणाला की, "मला हे सांगताना आनंद होत आहे की, जून महिन्यात माझ्या ऑक्सिजन प्लांट्सचा पहिला सेट कुर्नूल शासकीय रुग्णालयात आणि एक जिल्हा रुग्णालयात, आत्मकूर, नेल्लोर, एपी येथे उभारला जाईल याबद्दल मला आनंद आहे. यानंतर इतर गरजू राज्यात अधिक प्लांट लावण्यात येतील. ग्रामीण भारताला पाठिंबा देण्याची ही आता वेळ आहे."

Read More