Marathi News> मनोरंजन
Advertisement

सोनम कपूरच्या मेहंदी सोहळ्याला सुरूवात

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा 8 मे रोजी मुंबईत विवाहबद्ध होणार आहेत. दरम्यान अनिल कपूर यांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधीला सुरूवात झाली आहे. आज सोनम कपूरच्या मेहंदी सोहळ्याची सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर सोनमच्य्या मेहंदीचे फोटो व्हायरल होत आहेत. 

सोनम कपूरच्या मेहंदी सोहळ्याला सुरूवात

 मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा 8 मे रोजी मुंबईत विवाहबद्ध होणार आहेत. दरम्यान अनिल कपूर यांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधीला सुरूवात झाली आहे. आज सोनम कपूरच्या मेहंदी सोहळ्याची सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर सोनमच्य्या मेहंदीचे फोटो व्हायरल होत आहेत. 

 
 बॉलिवूडकरांची हजेरी   

 अनिल कपूर यांच्या घरी कपूर कुटुंबीयांप्रमाणेच बॉलिवूडच्याही तारे- तारकांनी हजेरी लावली आहे. आज अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर, अंशुला कपूर यांच्या सोबत करण जोहरही सोनमला शुभेच्छा देण्यासाठी पोहचला होता.  

 
 पारंपारिक वेषात सजली सोनम कपूर 

 मेहंदी सेरेमनीसाठी सोनम कपूरने खास पिंक आणि लव्हेंडर रंगाचा खास लेहंगा परिधान केला होता. सोनमला भारतीय वेशभूषेचे खास आकर्षण आहे. अनामिका खन्ना ही सोनमची आवडती डिझायनर आहे. अनामिकाचं सोनमच्या लग्नाचे ड्रेस डिझाईन करणार आहे. 

 

 

fallbacks
 
 

 

  8 मेला अडकणार लग्नबंधनात 

 

 आनंद अहुजा आणि सोनम कपूर गेले अनेक महिने रिलेशनशिपमध्ये होते. येत्या 8 मे रोजी हे दोघही विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत. मुंबईत गुरूद्वारामध्ये हा विवाहसोहळा पार पडल्यानंतर संध्याकाळी ग्रॅन्ड रिसेप्शन  होणार आहे. 
 

Read More