Marathi News> मनोरंजन
Advertisement

बाळाच्या जन्मानंतर Sonam Kapoor नं केला साजशृंगार... फोटो होतायत व्हायरल

कालच्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबरला देशभरात करवा चौथचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

बाळाच्या जन्मानंतर Sonam Kapoor नं केला साजशृंगार... फोटो होतायत व्हायरल

Sonam Kapoor Karwa Chauth: काल संपुर्ण देशात करवा चौथचा उपवास साजरा करण्यात आला. अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनीही आपल्या पतीसोबत करवा चौथ साजरी केली. चंद्र शोधण्यासाठी आपापल्या घरी सर्वच बॉलीवूड कपल्सनी करवा चौथचा बेत आखला होता. अगदी मौनी रॉयपासून शिल्पा शेट्टीपर्यंत. सगळ्यांनीच करवा चौथ साजरी केली. सध्या सेलिब्रेटी करवा चौथ (Celebrity Karwa Chauth) सोशल मीडियावर ट्रेन्डिंग आहे. (sonam kapoor shares a new picture of her karwa chauth ceremony)

कालच्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबरला देशभरात करवा चौथचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याहीवेळी बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अनिल कपूरच्या (Anil Kapoor House) घरी करवा चौथची पूजा करण्यात आली. ज्यामध्ये बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही सहभागी झाल्या होत्या. त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Video)

आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...

अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) तिच्या पहिल्या करवा चौथ लूक तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोनम कपूरने तिचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती लाल आणि हिरव्या रंगाच्या काठपदराच्या साडीत दिसत आहे. एथनिक लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिनं करवा चौथचा उपवास ठेवला नव्हता असेही समजते. 

आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का

सोनम कपूरने लिहिले की, ''माझे पती आनंद आहुजा करवा चौथ व्रत पाळत नाही. म्हणूनच मी हे व्रत ठेवलेले नाही. पण कोणताही सण आणि परंपरा असो, तो कुटुंबासोबत एकत्र साजरा करायला हवा कारण त्यातच आपली खरी परंपरा आहे, असे आम्हा दोघांचे मत आहे. मला खूप आवडते की माझी आई हे व्रत खूप प्रेमाने पाळते आणि मी देखील या परंपरेचा एक भाग आहे. करवा चौथच्या सर्वांना शुभेच्छा.'' अशी माहिती आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून सोनमनं दिली आहे. (Sonam Kapoor Instagram Post)

सोनम कपूरच्या या पोस्टमध्ये तिचे वडील अनिल कपूर आणि आई सुनीता कपूर यांनी हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनम कपूर नुकतीच आई झाली आहे. या वर्षी 20 ऑगस्ट रोजी सोनम कपूर आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) एका मुलाचे पालक झाले. दोघांनी एक खास पोस्ट शेअर करून आपल्या मुलाच्या जन्माची घोषणा केली होती. सोनमने तिच्या मुलाचे नाव वायु असं ठेवले आहे. 

Read More