Marathi News> मनोरंजन
Advertisement

Video Viral: सोनम कपूरपुढे झुकला पती Anand Ahuja; चक्क तिच्या बुटांजवळ जाऊन...

Sonam Kapoor आणि तिचा पती आनंद अहुजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मुलगा वायुला जन्म दिल्यानंतर ब्रँड प्रमोशनला सुरुवात केली आहे.

Video Viral: सोनम कपूरपुढे झुकला पती Anand Ahuja; चक्क तिच्या बुटांजवळ जाऊन...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor)ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम ही तिच्या फॅशन आणि स्टायलिंगसाठी ओळखली जाते. सध्या सोनम तिच्या कामात व्यस्त असून तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सोनमच्या पतीनं (Sonam Kapoor Husband Anand Ahuja) जे केलं ते पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिचं कौतूक केलं आहे. 

हेही वाचा : विवाहीत पुरुषांना Amitabh Bachchan यांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...

सोनमला ओळखणाऱ्यांना माहित आहे की ती किती सुंदर आयुष्य जगत आहे. सोनमप्रमाणेच तिचा नवराही प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची काळजी घेतो. त्याची एक झलक एका ब्रँडच्या स्टोअर लॉन्च इव्हेंटमध्ये पाहायला मिळाली. या जोडप्याने लोकप्रिय ब्रँडच्या स्टोअर लॉन्च कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

पाहा व्हिडीओ -

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या इव्हेंट दरम्यान, सोनम ब्रँडच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती आणि तिला हे समजलं नाही की तिच्या बुटाच्या लेस सुटल्या आहेत. सोनमचं बुटाच्या लेसकडे लक्ष नसतं, पण आनंदचं याकडे लक्ष होते. त्यामुळेच त्यानं कसलीही पर्वा न करता आपल्या पत्नीच्या बुटाचे लेस बांधल्या. सोनम कपूरवरील आनंद आहुजाचं हे प्रेम लोकांना कळलं आणि कोणत्याही कार्यक्रमात आपण आपल्या पत्नीला कसं सांभाळायला हवं हे प्रत्येकाला यातून नक्कीच कळलं असेल. 

सोनम आणि आनंद हे इंडस्ट्रीतील परफेक्ट कपलपैकी एक आहेत. दोघेही नेहमी एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसतात. सोनमच्या गरोदरपणातही आनंद तिला पूर्ण साथ देताना दिसत होता. 20 ऑगस्ट रोजी मुलगा वायुला जन्म दिल्यानंतर सोनम आता पूर्णपणे फिट झाली आहे. सोनम सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि आनंद आहुजासोबत नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. (sonam kapoor husband anand ahuja fix wife shoe lace at event video viral)  

Read More