Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून सोशल मीडियावर सोनम कपूरने बदललं स्वत:च नाव

'द जोया फॅक्टर'ची रिलीज डेट जाहीर

...म्हणून सोशल मीडियावर सोनम कपूरने बदललं स्वत:च नाव

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड स्टाईल आयकॉन अभिनेत्री सोनम कपूर अचानक चर्चेत आली होती. सोमन कपूरने लग्नानंतर सोशल मीडियावर तिचं नाव बदलल्याने चर्चा  होती. सोनम के अहूजाने सोशल मीडियावर जोया सिंह सोलंकी नाव बदलून सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं होतं. पण आता या नावामागचा उलगडा झाला आहे. सोनम कपूरचा आगामी 'द जोया फॅक्टर' चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

'द जोया फॅक्टर' चित्रपटातून सोनम कपूर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने या चित्रपटाच्या फर्स्टलूकसह चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 'द जोया फॅक्टर'च्या फर्स्टलूक पोस्टरमध्ये सोनम कपूर आणि दलकीर सलमान एका पुस्तकामागे लपलेले दिसत आहेत. सोनम कपूर जोया सिंह सोलंकी ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता दलकीर सलमानही प्रमुख भूमिकेत असणार आहे. 

fallbacks

fallbacks

fallbacks

'द जोया फॅक्टर' ही कथा लेखिका अनुजा चौहान यांच्या फिक्शनवर आधारित आहे. ही एका राजपूत मुलीची गोष्ट आहे. जिचं नाव जोया आहे. हिंदू मुलीच्या मुस्लिम नावाची ही गोष्ट आहे. अभिषेक शर्मा 'द जोया फॅक्टर'चे दिग्दर्शन करणार आहेत. 'द जोया फॅक्टर' १४ जून २०१९ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Read More