Marathi News> मनोरंजन
Advertisement

सोनाली फोगाट लेकीसाठी सोडून गेल्या कोट्यवधीची संपत्ती, तिच्या जीवालाही धोका

सोनाली फोगाट यांची लेक ही 15 वर्षांची आहे. 

सोनाली फोगाट लेकीसाठी सोडून गेल्या कोट्यवधीची संपत्ती, तिच्या जीवालाही धोका

मुंबई : भाजप नेता आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगाट यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यु झाला. सोनाली यांना 15 वर्षांची एक मुलगी असून तिचं नाव यशोधरा आहे. आई-वडिलांची सावली गेल्यानंतर कुटुंबीयांनी सांगितले की यशोधराच्या जीवाला धोका आहे. यशोधरा हिच्या वडिलांच्या मृत्युचं गूढ सहा वर्षांनंतरही समोर आलेलं नाही तर दुसरीकडे आई सोनालीचा मृत्यु झाला. यशोधराच्या सुरक्षेसाठी कुटुंबातील काही लोक लवकरच पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. 

आणखी वाचा : तू आता Underwear घातलीयेस का? Karan Johar चा टायगरला विचित्र प्रश्न

यशोधराचे काका कुलदीप फोगाट यांच म्हणणं आहे की, एसपींना भेटून यशोधराच्या सुरक्षेसाठी बंदूकधारी देण्याची मागणी केली जाईल. सोनालीच्या हत्येचा कट रचणारी व्यक्ती यशोधराच्या जीवाला धोका ठरू शकते. ती व्यक्ती मालमत्ता बळकावण्यासाठी आणखी एका खुनाचा कट रचू शकतो. यशोधराला आता हॉस्टेलमध्ये न ठेवता घरीच ठेवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे. यशोधराला तिच्या इच्छेनुसार आजीसोबत ठेवण्यात आले आहे. सोनालीच्या 1 सप्टेंबरला तेराव्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्याच वेळी, यशोधरा 21 वर्षांची होईपर्यंत तिचे मोठे काका कुलदीप हे तिचे केअर टेकर म्हणून राहतील.

सोनाली यांची 110 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आता त्या संपत्तीची वारस ही यशोधरा आहे. काका कुलदीप यांच्या म्हणण्यानुसार, सोनालीच्या नावावर पती संजयच्या मालमत्तेची सुमारे १३ एकरची जमिन आहे. त्याचबरोबर 6 एकरात फार्म हाऊस आणि रिसॉर्ट बांधलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिरसा रोड ते राजगड रोड बायपास दरम्यान ढंढूर गावात या जमिनीची किंमत सुमारे 7 ते 8 कोटी रुपये प्रति एकर आहे. सुमारे 96 कोटी रुपयांच्या जमिनीशिवाय रिसॉर्टची किंमत अंदाजे 6 कोटी रुपये आहे. संत नगरमध्ये सुमारे तीन कोटी रुपयांचं घरं आणि दुकानं आहेत. सोनालीकडे स्कॉर्पिओसह तीन गाड्या आहेत.

सोनाली यांच्या कुटुंबातील काही लोक सांगत आहेत की त्यांचे गुरुग्राममध्ये दोन फ्लॅट्स आहेत. पण त्या घराच्या कागदपत्रांविषयी कुटुंबीयांना माहिती मिळालेली नाही. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली यांच्याकडे 110 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

सोनाली यांनी मे 2022 मध्येच ढंढूर ते ढाणी या इंटरलॉकिंग टाइल रस्त्याच्या बांधकामाचे उद्घाटन केले होते. हा रस्ता सोनाली यांच्या फार्म हाऊससमोरून जाणाऱ्या दोन महामार्गांना जोडण्याचे काम करतो. हा रस्ता तयार झाल्यानंतर येथील जागेच्या भावानं मोठी झेप घेतली आहे.

Read More