Marathi News> मनोरंजन
Advertisement

Smriti Irani यांनी डोक्यावर कर्ज असतानाही दिला होता पान मसाल्याच्या जाहिरातीला नकार; स्वत: सांगितलं होतं कारण

Smriti Irani : स्मृती इराणी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरसोबतच राजकारणातील करिअरविषयी अनेक गोष्टींविषयी मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे. याच मुलाखतीत स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर कर्ज असताना देखील पान मसाल्याची जाहिरात का स्वीकारली नाही याविषयी देखील सांगितलं आहे. 

Smriti Irani यांनी डोक्यावर कर्ज असतानाही दिला होता पान मसाल्याच्या जाहिरातीला नकार; स्वत: सांगितलं होतं कारण

Smriti Irani : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सध्या देशातील महिला आणि बालविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, याआधी त्यांनी छोट्या पडद्यावर उत्तम कामगिरी करत स्वत:चं नाव कमावले. स्मृती इराणी यांनी टीव्ही मालिका 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मधून प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेत त्यांनी तुलसी ही भूमिका साकारली होती. अलीकडेच स्मृती इराणी यांनी खुलासा केला की, त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांना अनेक पान मसाला जाहिरातींची ऑफर आली होती, पण त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत.

स्मृती इराणी यांनी  YouTuber रणवीर अल्लाबदियाला दिलेल्या मुलाखतीत या विषयी सांगितले आहे. स्मृती इराणी यांनी यावेळी जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी घर घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले, याविषयी सांगितले आहे. त्या म्हणाल्या, "मला आठवते, जेव्हा मी माझ्या नवीन आयुष्य केलं होतं. त्यावेळी माझ्याकडे पैसे शिल्लक राहिले नव्हते. माझे नुकतेच लग्न झाले होते आणि माझ्या बँक खात्यात 20-30 हजारांपेक्षा जास्त पैसे नव्हते. मी एक घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्मृती इराणी यांनी खुलासा केला की तिने घरासाठी सुमारे 25-27 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि कर्जाची परत फेड करणे त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. यावेळी त्यांना 'पान मसाला जाहिरात' करण्याची ऑफर मिळाली. मात्र, त्यांनी ती नाकारले.स्मृती इराणी म्हणाल्या, "मला आठवतं की एके दिवशी माझ्या सेटवर कोणीतरी आलं आणि मला पान मसाल्याची जाहिरात देऊ केली... त्यांनी ऑफर केलेले पैसे माझ्या बँकेच्या कर्जाच्या दहापट होते. मी ती जाहिरात स्वीकारली नाही. लोकांनी मला वेड्यासारखे पाहिले, ते म्हणत होते, 'वेडी आहेस, तुला पैशाची गरज आहे."

पान मसाला जाहिरात नाकारण्याचे कारण

स्मृती इराणी यांनी पान मसाला जाहिरात नाकारण्याचे कारण सांगितले. त्या म्हणाल्या, "मला माहित होते की माझे कुटुंब पाहत आहे, तरुण पहात आहेत ते आपल्याला त्यांच्या कुटूंबाचा भाग समजतात आणि अचानक तुम्ही पान मसाला विकत आहात, म्हणून मी प्रामाणिकपणे नाही म्हणाले."

हेही वाचा : 'वडिलांचं नाव खराब करू नकोस', म्हणतं चाहतीनं लगावली होती Abhishek Bachchan च्या कानशिलात

स्मृती इराणी यांनी छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2000 ते 2008 या काळात प्रदर्शित झालेल्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतून लोकप्रियता मिळाली. 2016 मध्ये, स्मृती इराणी यांची भारत सरकारमध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Read More