Marathi News> मनोरंजन
Advertisement

काजल अग्रवालच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्री दिला गोंडस बाळाला जन्म

 'सिंघम' फेम काजल अग्रवाल नुकतीच आई झाली आहे

काजल अग्रवालच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्री दिला गोंडस बाळाला जन्म

मुंबई : 'सिंघम' फेम काजल अग्रवाल नुकतीच आई झाली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलू पालक क्लबमध्ये सामील झाले आहेत. ही आनंदाची बातमी ऐकून तिचे चाहते खूप खूश झाले आहेत. टीव्ही होस्ट आणि कॉमेडियन भारतीने अलीकडेच एका मुलाचा जन्म दिला आहे. त्याचबरोबर, राम आणि सीता, गुरमीत आणि देबिना हे प्रसिद्ध कलाकारसुद्धा नुकतेच पालक बनले आहेत.  

काजल आणि तिचा पती गौतम किचलू यांनी त्यांचे आई-वडील होण्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. पण चाहत्यांनी आतापासूनच या कपलचं अभिनंदन करायला सुरुवात केली आहे.

नवीन वर्ष 2022 निमित्त काजल अग्रवालने तिच्या चाहत्यांसोबत प्रेग्नंट असल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती. काजलने प्रेग्नेंसी पीरियडचा खूप आनंद लुटला होता. याबाबतच्या पोस्ट ती सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. इतकंच नाही तर ती योगा ते प्रेग्नेंसीच्या टिप्स चाहत्यांसोबत शेअर करतानाही दिसली.

काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांच्या मुलाची झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या काजल अग्रवाल आणि गौतम यांनी त्यांच्या मुलाची झलक सोशल मीडियावर शेअर केलेली नाही. लवकरच ते ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करतील.

Read More