Marathi News> मनोरंजन
Advertisement

'जजमेंटल हैं क्या' प्रदर्शनानंतरही 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटाची विक्रमी कमाई

'सिम्बा-द लायन किंग'  चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 

'जजमेंटल हैं क्या' प्रदर्शनानंतरही 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटाची विक्रमी कमाई

मुंबई : 'सिम्बा-द लायन किंग'  चित्रपट १९ जुलै रोजी रूपेरी पडद्यावर धडकला. चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास ११ कोटींपर्यंत मजल मारली आहे. अॅनिमेशनच्या जगात साकारण्यात आलेल्या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल ११६.०७ को़टी रूपयांपर्यंत मजल मारली आहे. तर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'जजमेंटल हैं क्या' चित्रपटाचा 'सिम्बा-द लायन किंग'ला काडी मात्र फरक पडलेला नाही. शिवाय चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहेत. 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 'सिम्बा-द लायन किंग' १९ जून मध्ये चित्रपटगृहात दाखल झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 

अॅनिमेशच्या जगात साकारण्यात येणाऱ्या या चित्रपटाला आवाज खुद्द किंग खान अभिनेता शाहरूख खान आणि मुलगा आर्यन खान यांनी दिला आहे. मुफासा या व्यक्तीरेखेला शाहरूखने आवाज दिला आहे, तर सिम्बा या व्यक्तीरेखेला आर्यनने आवाज दिला आहे. 

'सिम्बा-द लायन किंग' चित्रपट भारतात एकूण २ हजार १४० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपट हिंदी, तेलुगू, इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. एव्हेंजर्स चित्रपटाच्या सीरीजला टक्कर देत 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटने कमाईच्या यादीत टॉप ३ मध्ये नाव कमावले आहे.

Read More