Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सिम्बा-द लायन किंग' आणि 'सुपर ३०' चित्रपटांमध्ये काटे की टक्कर

'सिम्बा-द लायन किंग' चित्रपट भारतात एकूण २ हजार १४० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

'सिम्बा-द लायन किंग' आणि 'सुपर ३०' चित्रपटांमध्ये काटे की टक्कर

मुंबई : 'सिम्बा-द लायन किंग'  चित्रपट १९ जुलै रोजी रूपेरी पडद्यावर धडकला. चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास ११ कोटींपर्यंत मजल मारली आहे. चित्रपटाने अठवड्याभरामध्ये ७५ कोटीरूपयांपेक्षा जास्त गल्ला जमा केला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत.  

त्याचप्रमाणे, १२ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या 'सुपर ३०' चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही चित्रपटांना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता हृतिक रोशन चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. 

'सिम्बा-द लायन किंग' चित्रपट भारतात एकूण २ हजार १४० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपट हिंदी, तेलुगू, इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. एव्हेंजर्स चित्रपटाच्या सीरीजला टक्कर देत 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटने कमाईच्या यादीत टॉप ३ मध्ये नाव कमावले आहे.

Read More