Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kiara आणि Sidhharth Malhotra या दिवशी घेणार सप्तपदी! लग्नाची तारीख आणि ठिकाण ठरलं

Kiara Advani आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाच्या तारखेविषयी मोठा खुलासा, सोशल मीडियावरील पोस्टमुळे एकच चर्चा

Kiara आणि Sidhharth Malhotra या दिवशी घेणार सप्तपदी! लग्नाची तारीख आणि ठिकाण ठरलं

Sidhharth Malhotra and Kiara Advani Wedding News : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) या दोघांचे लाखो चाहते आहेत. सिद्धार्थ आणि कियारा यांचे चाहते त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आल्याचे आज आपण म्हणू शकतो. सिद्धार्थ आणि कियारा दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. सिद्धार्थ आणि कियारा या महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.  

या ठिकाणी आणि या दिवशी घेणार सप्तपदी!

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची बातमी ही सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत दिली आहे. सिद्धार्थ कियारा आणि ज्या ठिकाणी ते दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत त्या जागेचा फोटो विरल भयानीनं शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत विरल भयानीनं कॅप्शन दिलं की कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं लग्न कव्हर करण्यासाठी जैसलमेरला जात आहोत.  4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सूर्यगढ पॅलेसमध्ये ते दोघे सप्तपदी घेणार असल्याचा खुलासा विरल भयानीनं केला आहे. त्याचे लग्न करण्यासाठी पापाराझी जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नासाठी कडेकोड बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी जैसलमेरला एक सिक्योरिटी टीम पाठवण्यात येणार आहे. सिद्धार्थ आणि कियारा हे जैसलमेर पॅलेस या आलिशान हॉटेलमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. दरम्यान, सिद्धार्थ- कियारा किंवा त्या दोघांच्या जवळच्या कोणत्या व्यक्तीनं अजून या बातमीला दुजोरा दिलेला नाही. 

हेही वाचा : Video : यूट्यूबर Armaan Malik तिसऱ्या पत्नीला घरी घेऊन आला; सवतीला पाहताच दोन्ही पत्नींनी...

सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह (Shershaah) या चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ हे सगळीकडे एकत्र दिसले. 

या दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ लवकरच, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' (Indian Police Force) या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, कियाराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे

Read More