Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sidnaaz : सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली जाण्याने पूर्णपणे कोलमडली शहनाज

शहनाज गिलसाठी सिद्धार्थचं जाणं हा खूप मोठा धक्का 

Sidnaaz : सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली जाण्याने पूर्णपणे कोलमडली शहनाज

मुंबई : सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत आहेत. गुरूवारी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचं निधन झालं. शुक्लाच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबियांना आणि गर्लफ्रेंड शहनाजला खूप मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थचं अकाली जाणं शहनाजसाठी खूप मोठा धक्का आहे. 

काल पासूनच सगळ्यांच्या नजरा होत्या त्या अभिनेत्री शहनाज गिलवर. शहनाजच्या वडिलांनी तिच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं. शहनाज गुरूवारपासून कुणाशीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. राहुल महाजनने देखील शहनाज गिलची भेट घेतली. सिद्धार्थच्या जाण्याचं दुःख तिला पचवणं अतिशय कठीण होत आहे. 

fallbacks

या फोटोंमध्ये ती पूर्णपणे तुटलेली आहे. सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याकरता शहनाज पोहोचली आहे. 

 

fallbacks

 2019 मध्ये, जेव्हा शहनाज आणि सिद्धार्थ रिअॅलिटी शो बिग बॉस 13 चा भाग बनले तेव्हा दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. ट्विटरवर नेहमीच एक ट्रेंड होता - सिडनाझ. आता सिडनाझची ही जोडी तुटली आहे.

fallbacks

एकदा सिद्धार्थने शहनाजबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शहनाज एक हसणारी व्यक्ती आहे, ती कोणाच्याही जवळ असते तेव्हा ती सकारात्मकता पसरवते. आता या प्रिय मित्राच्या जाण्यानं शहनाज पूर्णपणे खचली आहे. शहनाजची ही अवस्था तिच्या आणि सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी खूप मोठा धक्का आहे. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Thesidnaaz (@thesidnaaz2020)

शहनाज गिल सिद्धार्थच्या जाण्याने पूर्णपणे कोलमडून गेली आहे. सिद्धार्थला नेमकं असं काय झालं की तो अवघ्या काही तासांत जगाचा निरोप घेऊन गेला. 

Read More