Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिकासोबतच्या किसिंग सीनवर सिद्धांतच्या काकांचा प्रश्न, ' तिचा स्पर्श झाला की...'

काकांच्या प्रश्नावर सिद्धांतचं उत्तर... व्हिडीओ पाहून तुम्हीला देखील बसेल धक्का  

दीपिकासोबतच्या किसिंग सीनवर सिद्धांतच्या काकांचा प्रश्न, ' तिचा स्पर्श झाला की...'

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर 'गहराइया' सिनेमाने प्रेक्षकांचं  लक्ष वेधलं आहे. सिनेमात दीपिका आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्यात  अनेक इंटिमेट सीन चित्रीत करण्यात आले आहेत. सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगत असताना विनोदवीर कपिल शर्माने 'द कपिल शर्मा'शोच्या भागातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शोच्या सेटवर 'गहराइया' चित्रपटाची संपूर्ण टीम दिसत आहे. सेटवर रंगलेली थट्टा-मस्करी चाहत्यांना आवडत आहे. 

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सिद्धांत आणि दीपिकामध्ये अनेक किसिंग सीन दाखवण्यात आले आहेत. यावर सिद्धांतने त्याच्या कुटुंबाची प्रतिक्रिया कशी होती सांगितलं आहे. 

शो दरम्यान कपिलने सिद्धांतला विचारलं, 'किसिंग सीन पाहून जर वडिलांनी सांगितलं की, पुढच्या वेळी मला देखील एक रोल ठेव...' यावर सिद्धांतने दिलेल्या उत्तरानंतर जमलेले पोट धरून हसू लागले. 

सिद्धांत म्हणाला, 'ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मला काकांचा फोन आला, ते गावी राहतात. ते मला म्हणाले दीपिकाला किस करताना स्पर्श झाला की मध्ये आरसा ठेवला होता?' सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 'गहराइया' सिनेमा आजपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात दीपिका आणि सिद्धांत शिवाय आभिनेत्री अनन्या पांडे, अभिनेता धैर्य करवा देखील मुख्य भूमिकेत आहेत. 

Read More