Marathi News> मनोरंजन
Advertisement

'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमाचा फाडू ट्रेलर लाँच

आयुष्मानचा आगामी सिनेमा

'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमाचा फाडू ट्रेलर लाँच

मुंबई : आयुष्मान खुरानाचा नवा सिनेमा 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'समलैंगिक' प्रेमसंबंधावर आधारित या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. 'कार्तिक का प्यार होकर रहेगा अमन!' असं म्हणत या ट्रेलरची चर्चा उत्सुकता वाढली आहे. 

'शुभ मंगल सावधान' सिनेमाचा सिक्वल असून हितेश केवालियाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच आनंद एल राय या सिनेमाची निर्मिती करत आहेत. नीना गुप्ता यांनी या सिनेमात आयुष्मानच्या आईची भूमिका साकारली आहे. 

आतापर्यंत सगळे हिट सिनेमे देणाऱ्या आयुष्मान खुरानाच्या या सिनेमाची देखील खूप उत्सुकता आहे. 21 जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात समलैगिक प्रेमप्रकरणावर प्रकाश टाकला आहे. या सिनेमातून पहिल्यांदा आयुष्मान गे ची भूमिका साकारणार आहे. लव इंटरेस्टचा रोल साकारताना आयुष्मान दिसत आहे. आयुष्मानसोबत नीना गुप्ता आणि गजराज राव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात आयुष्मान खुरानाच्या अपोझिट कोटा फॅक्टरी स्टार जितेंद्र कुमार आपल्याला दिसणार आहे. 

'शुभ मंगल सावधान' सिनेमातून आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकरने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता या सिक्वलमधून नेमकं काय घडणार? याकडे प्रेक्षकांच  लक्ष आहे. 'बधाई हो', 'आर्टिकल 15' आणि 'बाला' सारखे अफलातून सिनेमे आतापर्यंत आयुष्मान घेऊन आला आहे. या सिनेमांनी प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन केलं. यामुळे साऱ्यांच लक्ष हे 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या सिनेमाकडे वळलं आहे. 'गे' ची भूमिका साकारणार आयुष्मान प्रेक्षकांच्या पसंतीला पडतो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Read More