Marathi News> मनोरंजन
Advertisement

Net Worth : शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर आहे कोट्याधीश, एका चित्रपटासाठी घेते ऐवढे पैसे

श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. 

Net Worth : शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर आहे  कोट्याधीश, एका चित्रपटासाठी घेते  ऐवढे पैसे

मुंबई : श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. प्रत्येक वेळी ती तिच्या अभिनयानं सर्वांची मन जिंकते. श्रद्धाने खूप कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रद्धाने 'तीनपत्ती' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. तेव्हापासून आतापर्यंत श्रद्धा एका विशिष्ठ स्थानावर पोहोचली आहे. श्रद्धा आज कोटींच्या मालमत्तेची मालक बनली आहे.

श्रद्धा कपूरने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात २०१० पासून केली. अभिनयाबरोबरच ती बर्‍याच ब्रँडला एन्डोर्स करत आहे. श्रद्धा आजच्या काळात कोटींची मालकिन बनली आहे. आज आम्ही तुम्हाला श्रद्धा कपूरच्या नेट वर्थविषयी सांगणार आहोत. 

एका वृत्तानुसार श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. अभिनय, एंडॉर्समेंट, मॉडेलिंग आणि इतर बर्‍याच गोष्टींमधून ती पैसे कमवते. श्रद्धा कपूरच्या नेट वर्थबद्दल बोलायचं झालं तर ती 57 कोटींच्या प्रॉपर्टीची मालक आहे. एका चित्रपटासाठी ती सुमारे 5 कोटी रुपये घेते. श्रद्धा कपूर आपल्या कुटूंबासह मुंबईत जुहूमध्ये  राहते.  या घराचा लुक फर्निचरपासून ते भिंतींच्या टेक्शरपर्यंतचा विंटेज आहे.

श्रद्धा कपूरचं एंडॉर्समेंट
अभिनयाबरोबरच श्रद्धा कपूरने बर्‍याच ब्रँड्सची जाहिरातही केली. तिने लॅक्मे, फ्लिपकार्ट, सिक्रेट टेम्पटेशन आणि  वीट यासह अनेक ब्रँडचं एंडॉर्स केलं आहे. ज्यासाठी तीने मोठी किंमत घेतली आहे.

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असून ती तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांना प्रचंड आवडतो. इंस्टाग्रामवर श्रद्धाला 63 लाखांहून अधिक लोकं फॉलो करतात. तिचे प्रत्येक फोटो पोस्ट व्हायरल होतेच.

वर्क फ्रंटवरबद्दल बोलायचं झालं तर, श्रद्धा अखेर 'बागी 3' या सिनेमामध्ये टायगर श्रॉफच्यासोबत दिसली होती. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला. आता ती लवकरच रणबीर कपूरसोबत 'लव रंजन' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती 'नागीन' आणि 'चालबाज ईन लंडन'मध्येही  दिसणार आहे.

Read More