Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : 'स्त्री' च्या ट्रेलरमध्ये अखेर मिळणार उत्तर... 'मर्द को दर्द क्यों होगा?'

पाहा अफलातून ट्रेलर

VIDEO : 'स्त्री' च्या ट्रेलरमध्ये अखेर मिळणार उत्तर... 'मर्द को दर्द क्यों होगा?'

मुंबई : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा सिनेमा 'स्त्री' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिल्यांदाच या दोघांची जोडी स्क्रिनवर पाहायला मिळणार आहे. राजकुमार राव या अगोदर 'रागिनी एमएमएस' या हॉरर सिनेमांत दिसला आहे. मात्र 'स्त्री' या सिनेमांत राजकुमार राव हॉररसोबतच कॉमेडी देखील करताना दिसला आहे. ट्रेलरमध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावची जोडी एकदम फ्रेश दिसत आहे. या सिनेमाच 'अब मर्द को दर्द होगा' सारख्या टॅगलाईन खाली प्रमोशन करण्यात आल आहे. मात्र या ट्रेलरमधून या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव पहिल्यांदाच एकत्र 

ट्रेलरमधून असं दिसतंय की, राजकुमार रावची अशी गर्लफ्रेंड आहे जी फक्त वर्षातून एकदाच त्याच्या भेटीला येते. राजकुमार राव पेशाने टेलर आहे. ज्यामध्ये तो खूप इंटरेस्टिंग वाटत आहे. या सिनेमात 'दंगल' फेम अभिनेत्री अपारशक्ति खुराना वेगळ्या रुपात दिसत आहे. या सिनेमातून हॉरर कॉमेडी भेटीला येत आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर 'स्त्री' सिनेमातून वेगळ्या रुपात भेटायला येते. या सिनेमातून पंकज त्रिपाठी आणि राजकुमार राव ही जोडी मजेदार अंदाजात भेटायला येत आहे. हा सिनेमा 31 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. 

Read More