Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक : प्रसिद्ध कॉमेडियनवर आली रस्त्यावर बसून गाणं म्हणण्याची वेळ?

कॉमेडी नाइट्स विद कपिल शर्मा'मध्ये 'गुत्थी'चा रोल प्ले करुन घरा-घरात पोहचलेला अभिनेता सुनील ग्रोवरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

धक्कादायक : प्रसिद्ध कॉमेडियनवर आली रस्त्यावर बसून गाणं म्हणण्याची वेळ?
Updated: Mar 14, 2024, 04:57 PM IST

मुंबई : कॉमेडी नाइट्स विद कपिल शर्मा'मध्ये 'गुत्थी'चा रोल प्ले करुन घरा-घरात पोहचलेला अभिनेता सुनील ग्रोवरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र या शोनंतर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरचं भांडणदेखील चर्चेत होतं. तेव्हापासूनच कॉमेडी दुनियेतील या दोन्ही स्टारला एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. 

एक्टिंग सोडून रस्त्यावर गाणं गाताना दिसला अभिनेता
नुकतीच अभिनेत्याची 'सनफ्लॉवर 2' ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मर्डर मिस्ट्रीवर आधारित ही वेबसिरीज प्रेक्षकांना खूप आवडत आहे. झी 5वर ही वेबसिरीज तुम्ही पाहू शकता. सध्या या वेबसिरीजचा चांगलाच बोलबाला आहे. 

या आधी केस कापताना दिसला होता आभिनेता
या आधी एका छोट्याश्या सलूनमध्ये एका माणसाचे अभिनेता सुनिल ग्रोव्हर केस कापताना दिसला होता. सुनिलने याचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊन्टवर शेअर केला होता. इतकंच नाहीतर कधी भाजी विकताना तर कधी रस्त्याच्या बाजूला कपडे धुताना अभिनेता दिसला होता. 

व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
आता या सर्व बातम्यांदरम्यान, नुकताच सुनील ग्रोव्हरने त्याच्या इन्स्टावर रस्त्याच्या बाजूला गाणं ऐकत असून गाणं म्हणतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ स्वत: अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती त्याच्या बाजूला दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॉमेडियनने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, Exclusive for me!   सुनीलचा हा साधेपणा पाहून चाहते त्याचं खूप कौतुक करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ पाहून अभिनेत्यावर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, down to Earth person जमींन मे घुसा हुआ व्यक्ति. तर अजून एकाने लिहीलंय, खोल अर्थ आणि खूप सुंदर आवाज आणि कलाकार. तर अजून एकाने लिहीलंय, तुम्ही एकदा वाजवा आणि त्याला आप आये हमारे घर पे हे गाणे ऐकवा. तर अजून एकाने लिहीलंय, कपिल शर्मा शोमध्ये तुझी वाट पाहतोय. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते या व्हिडीओवर करत आहेत. सध्या अभिनेत्याचा हा व्हिडीओ चाहत्यांची मने जिंकत आहे इतकं मात्र नक्की.