Marathi News> मनोरंजन
Advertisement

11 मुलांना डेट केल्यानंतरही ही विश्वसुंदरी अविवाहित

43 वा वाढदिवस साजरा करतेय ही अभिनेत्री 

11 मुलांना डेट केल्यानंतरही ही विश्वसुंदरी अविवाहित

मुंबई : आपलं सौंदर्य आणि अभिनयामुळे लोकप्रिय ठरलेली ही अभिनेत्री कायमच चर्चेत राहिली आहे. कधी तिच्या सौंदर्यामुळे तर कधी तिच्या निर्णयांमुळे. लग्ना अगोदरच या अभिनेत्रीने 2 मुली दत्तक घेऊन समाजात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. अशा या अभिनेत्रीचा आज 43 वा वाढदिवस आहे. 

सध्या सुष्मिता आपल्या डेटींगमुळे चर्चेत आहे. रोमन 27 वर्षांच्या मुलाला सुष्मिता डेट करत आहे. रोमन 15 वर्षांनी सुष्मितापेक्षा लहान आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मिताने दिवाळीत रोमनसोबतचा व्हिडिओ शेअर केला होता. 

रोमनच्या अगोदर सुष्मिताचे एक-दोन नव्हेत तर तब्बल 10 बॉयफ्रेंड होते. सुष्मिता एक अशी अभिनेत्री आहे जिने कायमच आपल्या म्हणण्यानुसार आयुष्य जगलं आहे. नाईट क्लबचा मालक असलेला रितिक भसीनला सुष्मिता दोन वर्ष डेट करत होती. 

बिल्डर इम्तियाज खत्री देखील काही काळ सुष्मिताचा बॉयफ्रेंड राहिला आहे. तसेच टॅलेंट कंपनी बंटी सचदेवा देखील तिच्या बॉयफ्रेंड होता. अभिनेता रणदीप हुड्डासोबत देखील तिचं नाव जोडलं गेलं. 

रणदीप हु्डासोबत ब्रेकअप केल्यानंतर सुष्मिता सेनचं नाव अॅडमॅन मानव मेननसोबत रिलेशनशिपमध्ये होती. हॉटेल मालक असलेला संजय नारंग देखील सुष्मिताच्या बॉयफ्रेंड होता. असं देखील लोकं म्हणतात की, सुष्मिता आणि संजयचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र कालांतराने त्यांच ब्रेकअप झालं. 

सुष्मिता सेनचं निर्माता विक्रम भट्टसोबत देखील नातं होतं. तसेच 'दुल्हा मिल गया' दिग्दर्शक मुद्दसर अजीजसोबत सुष्मिताचं नावं जोडलं गेलं. सुष्मिता सेनचं या अगोदर पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरमसोबत एक शो होस्ट करत होती तेव्हा त्यांच्या नावाची देखील चर्चा झाली. 

सुष्मिताचं नाव अनिल अंबानी यांच्यासोबत देखील जोडलं गेलं. पण पुढे याची काही चर्चा झाली नाही. सुष्मिताच्या या बॉयफ्रेंडप्रमाणेच आणखी एका गोष्टीमुळे ती चर्चेत आली. ते म्हणजे तिचं मातृत्व. सुष्मिताने 2 मुलींना दत्तक घेतलं आहे. यातील मोठी मुलगी रेने ही अनिल आणि सु्ष्मिता यांचीच मुलगी असल्याचं देखील सांगण्यात येत होतं. 

Read More