Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shocking news Sushant Singh Rajput चा मर्डरच? या व्यक्तीचा खळबळजनक खुलासा

नुकतंच सुशांतच्या मृत्याबाबतीत एक धक्कादायक खुलासा करणारं वक्तव्यही समोर आलं आहे. सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून त्याचा खून करण्यात आला असल्याचं, हे मोठं वक्तव्य...

Shocking news Sushant Singh Rajput चा मर्डरच? या व्यक्तीचा खळबळजनक खुलासा

Sushant Singh Rajput  death case: सुशांत सिंह राजपूतला(Sushant Singh Rajput) जाऊन 2 वर्ष होत आली मात्र त्याच्या मृत्युचं गुढ अद्यापही उकलू शकलं नाही(death mystry of sushant singh rajput). सुशांत सिंह राजपूतच्या मृत्याबाबतीत बऱ्याच वावड्या उठल्या. अनेकांनी याला आत्महत्या असल्याचं म्हटलं तर काहींनी त्याचा खून झाला(sushant singh death is murder or suicide?) असल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) आणि इतर बऱ्याचजणांची नावं पुढे येऊ लागली.

आणखी वाचा:शाळेतच चिमुकलीनं जे केलं, त्याचा Video पाहून खुद्द Rashmika Mandanna ही हैराण 

नुकतंच सुशांतच्या मृत्याबाबतीत एक धक्कादायक खुलासा करणारं वक्तव्यही समोर आलं आहे. सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून त्याचा खून करण्यात आला असल्याचं, हे मोठं वक्तव्य.(new statement on sushant singh rajput death,said it was murder?)
 
बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा(perfectionist Aamir Khan) भाऊ फैजल खानचं (faisal khan)हे वक्तव्य. सिनेजगतातून दुरावा घेण्यासाठी आपल्या कुटुंबालाच दोष देणाऱ्या फैजलची यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली. पण, यावेळी मात्र त्यानं अनेकांच्या नजरा वळवल्या.  

आणखी वाचा:Shahid Kapoor झाला पर्सनल बॉय? 'मॅडम- मॅडम' म्हणत कोणाची करतोय सेवा, Video व्हायरल

काय म्हणाला फैजल?

हल्लीच सलमान खानच्या(salman khan, bigg boss) बिग बॉस च्या नवीन पर्वात आपल्याला  बोलवण्यात आलं असून ती ऑफर मी नाकारली असल्याचं तो म्हणाला आणि पुन्हा चर्चेत आला. पण नुकतंच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्याने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत धक्कादायक गोष्ट समोर आणली. '' मला माहित आहे सुशांतचा खूनच झाला आहे, हा खटला पुन्हा कधी सुरु होईल आणि काय वळण घेईल माहित नाही. हे सर्व आता येणारी वेळच ठरवेल, या केसाचा तपास सुरु आहे.... मी देवाकडे प्रार्थना करतो कि, सत्य लवकरच सर्वांसमोर येवो कि जेणेकरून सर्वाना ते कळेल '', असं तो म्हणाला.

सध्या फैजलच्या वक्तव्याचे आता पुढे नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मात्र सध्या सुशांत सिंह राजपूतचं मृत्यू प्रकरण(sushant singh rajput death case) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे हे नाकारता येणार नाही.

Read More