Marathi News> मनोरंजन
Advertisement

श्रीदेवी : शिरीष कुंदरने केलेल्या ट्विटमुळे कलाकार नाराज

श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलिवूड धक्क्यात आहे. 

श्रीदेवी : शिरीष कुंदरने केलेल्या ट्विटमुळे कलाकार नाराज

मुंबई : श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलिवूड धक्क्यात आहे. 

कुणालाही आजही या गोष्टीवर विश्वास ठेवणं शक्य झालं नाही. तसेच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की, बॉलिवूडसाठी हे सर्वात मोठं नुकसान आहे. अनेक कलाकारांनी श्रीदेवी यांच्यासोबत फोटो शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर कोरिओग्राफर फराह खानचा नवरा आणि फिल्ममेकर शिरीष कुंदर भडकला आहे. 

काय म्हणाले शिरीष कुंदर ? 

प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी आणि हृतिक रोशन सारख्या अनेक कलाकारांनी श्रीदेवी यांच्यासोबतच फोटो शेअर करून आठवणींना उजाळा दिला. यावर शिरीष कुंदर यांने म्हटलं की,  कुणाचं निधन झालं की त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं हे काही औचित्य नाही. म्हणून मी आशा करतो की, एके दिवशी लोकांना याची जाणीव होईल. 

 

Still can’t believe it. #sridevi 

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

Read More