Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिल्पाची 'मर्लिन मन्रो' पोझ व्हायरल

बॉलिवडूमध्ये आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी शिल्पा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

शिल्पाची 'मर्लिन मन्रो' पोझ व्हायरल

मुंबई : बॉलिवूडमध्ये 'फिट गर्ल' म्हणून ओळखणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी कुंद्रा तिच्या फिटनेस बद्दल प्रचंड जागृत असते. तिचे फिटनेसचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे बॉलिवूडची ही फिट गर्ल सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. नुकताच शिल्पाने सुट्ट्यांचा आनंद घेत असताचा जूना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिला करायचे होते काय, आणि झाले काय. असं चित्र दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ती नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ''क्रुझवर माझा 'मर्लिन मर्नो' क्षण. शेवट पर्यंत पाहा.'' असे लिहले आहे. 

बॉलिवडूमध्ये आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी शिल्पा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. रमेश तौरानी यांच्या प्रॉडक्शन खाली साकारण्यात येणाऱ्या चित्रपटात शिल्पा भूमिका साकारणार आहे. चित्रपटामध्ये शिल्पा शिवाय अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता दिलजीत दोसांझ झळकणार आहे.  

Read More