Marathi News> मनोरंजन
Advertisement

मराठमोळ्या शिल्पा तुळसकरचा वयाने लहान अभिनेत्यासोबत रोमान्स; व्हिडिओ समोर

या सीरिजमध्ये वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर शिल्पा रोमान्स करताना दिसणार आहे.

मराठमोळ्या शिल्पा तुळसकरचा वयाने लहान अभिनेत्यासोबत रोमान्स; व्हिडिओ समोर

मुंबई : छोट्या पडद्यावरील 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) ही मराठी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. मालिकेत स्वप्निल सौरभ ही भूमिका तर शिल्पा ही अनामिका भूमिका साकारत आहेत. 

त्यांचा एक इंटीमेट सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येताच याची खूप चर्चा प्रेक्षकांमध्ये पहायला मिळाली होती. मालिकेत रोमँन्टिक अंदाजात दिसलेली शिल्पा आता खऱ्या आयुष्यात रोमँन्टिक अंदाजात दिसणार आहे.  'हसरत' असं वेब सीरिजचं नाव आहे. या सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 

या सीरिजमध्ये वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर शिल्पा रोमान्स करताना दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये सीरिजमधील तिच्या इंटिमेट सीनची झलकही दिसत आहे. १२ डिसेंबरपासून 'हंगामा' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. १२ डिसेंबरपासून 'हंगामा' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मालिकेमध्ये सौऱभ व अनामिकाची केमिस्ट्री अधिक फुलत असताना शिल्पाचा हा रोमँन्टिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काहिंनी हा व्हिडिओ पाहून शिल्पाचं कौतूक केलं आहे. तर काहींनी मात्र  नकारात्मक कमेंट केल्या आहेत. युजर्सनी तिला ट्रोलही करण्यास सुरुवात केली आहे.  

Read More