Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानची 'भाभी' होणार का? शिल्पानं दिलं हे उत्तर

बिग बॉसच्या ११ व्या सिझनमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेनं बाजी मारली.

सलमानची 'भाभी' होणार का? शिल्पानं दिलं हे उत्तर

मुंबई : बिग बॉसच्या ११ व्या सिझनमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेनं बाजी मारली. 'भाभीजी घर पर है' या मालिकेमधून शिल्पा घराघरात पोहोचली. पण निर्मात्यांसोबत झालेल्या भांडणामुळे शिल्पाला ही मालिका सोडावी लागली होती. पण बिग बॉसमधून शिल्पा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या घरात पोहोचली.

बिग बॉस जिंकल्यावर शिल्पाला सलमानची भाभी व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मी सलमानसाठी काहीही करायला तयार असल्याची प्रतिक्रिया शिल्पानं दिली. सलमानसोबत काम करण्याची ऑफर आली आहे का? या प्रश्नावर मात्र आपल्याला अशी कोणतीही ऑफर नाही. सलमाननं बिग बॉसच्या घरामध्ये जो पाठिंबा दिला त्यासाठीच मी खुश आहे, असं शिल्पा म्हणाली. 

Read More