Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिल्पाची लेक जपतेय परंपरा, प्रतिष्ठा...; नेटकरी कौतुक करता थांबेना, पाहा Video

शिल्पानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

शिल्पाची लेक जपतेय परंपरा, प्रतिष्ठा...; नेटकरी कौतुक करता थांबेना, पाहा Video

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं (Shilpa Shetty) रविवारी रात्री धमाकेदार दिवाळी पार्टी दिली. अनिल कपूरपासून शमिता शेट्टी, रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया, एकता कपूर, आर्यन खान यांनी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, याच दरम्यान शिल्पा शेट्टी तिची लेक समिषा शेट्टीचा एक रांगोळी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी समिषा आणि शिल्पाचं कौतुक केलं आहे. 

शिल्पानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पा तिचा मुलगा विआन आणि लेक समिषा रांगोळी काढताना दिसत आहे. शिल्पानं हा व्हिडीओ शेअर करत, 'आमची वार्षिक परंपरा सुरू ठेवत... रांगोळी काढण्याची वेळ आली आहे. आशा आहे की हे वर्ष तुम्हाला आरोग्याची संपत्ती, सकारात्मकतेचा प्रकाश आणि भरपूर समृद्धी लाभो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा,' असे कॅप्शन दिले आहे. (Shilpa Shetty Rangoli With Daughter Samisha Goes Viral Fans Praise Tradition And Culture Video viral) 

या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी शिल्पाचं कौतुक केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की, 'तुम्ही तुमच्या मुलांना भारतीय संस्कृती शिकवत आहात हे पाहून अभिमान वाटतो. देव तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करो. दिवाळी आनंदाची आणि आरोग्याची जावो.' दुसरा नेटकरी म्हणाला, 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिल्पाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सोनल जोशी दिग्दर्शित 'सुखी' या चित्रपटात शिल्पा शेट्टी लवकरच दिसणार आहे. याशिवाय ती रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय देखील आहेत. शिल्पाचा शेवटचा रिलीज 'हंगामा 2' होता. यामध्ये तिच्यासोबत परेश रावल, मीजन आणि प्रणिता सुभाष होते.

Read More