Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बिग ब्रदर' रिअ‍ॅलिटी शो संबधित शिल्पा शेट्टीचं मोठं वक्तव्य म्हणाली...

 17 जून रोजी शिल्पा शेट्टी कुंद्राचा 'निकम्मा' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे

'बिग ब्रदर' रिअ‍ॅलिटी शो संबधित शिल्पा शेट्टीचं मोठं वक्तव्य म्हणाली...

मुंबई : 17 जून रोजी शिल्पा शेट्टी कुंद्राचा 'निकम्मा' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री (शिल्पा शेट्टी कुंद्रा) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान, मुलाखतीत, अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनाशी संबंधित अनेक रहस्यं चाहत्यांसमोर आली आहे.

या एपिसोडमध्ये एका मुलाखतीदरम्यान तिने 'बिग ब्रदर' या रिअॅलिटी शोशी संबंधित एक गुपित उघड केलं आहे. खरंतर अभिनेत्रीने 2007 मध्ये 'बिग ब्रदर' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये सहभागी झालेल्या 14 सेलिब्रिटी स्पर्धकांना मागे टाकत शिल्पा या शोची विजेतीही ठरली. शिल्पाने आता या शोशी संबंधित एक गुपित उघड केलं आहे.

शिल्पा शेट्टी कुंद्राला 'बिग ब्रदर' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घ्यायचा नव्हता. या शोदरम्यान शिल्पासोबत एक घटना घडली.  ज्यावर संपूर्ण देशाने तिला पाठिंबा दिला.  या शोमध्ये जायला भीती वाटत असल्याचं शिल्पाने सांगितलं. रिअॅलिटी शोच्या दिवसांची आठवण करून देताना शिल्पा म्हणाली, 'मी दोन एपिसोड पाहिले होते आणि ते पाहून घाबरले होते'. शिल्पाच्या म्हणण्यानुसार, ती इतकी घाबरली होती की, तिने हा शो करण्यास नकार दिला.

पण, शोच्या निर्मात्यांशी शिल्पाचा करार अतिशय कडक होता. याच कारणामुळे शिल्पा शो सोडू शकली नाही..

'बिग ब्रदर' या रिअॅलिटी शोबद्दलही शिल्पाने पुढे सांगितलं, 'मला वाटलं होतं की लोकं मला दुसऱ्या आठवड्यातच शोमधून काढून टाकतील. दर आठवड्याला माझं नाव नॉमिनेट होतं, पण मी वाचले. मला आश्चर्य वाटलं की हे कसं होत आहे? त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात मला कळालं की, मला सपोर्ट करणारे अनेक भारतीय आहेत.
 
माझ्या जिंकलेल्या शोच्या मागे साऊथ इंडियन आहेत. त्यांच्या मतांमुळेच मला ट्रॉफी मिळवता आली.   शिल्पा शेट्टी लवकरच 'निकम्मा'  या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पासोबत शर्ली सेटिया आणि अभिमन्यू दासानी देखील दिसणार आहेत.

Read More