Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिल्पाचा पतीसाठी अनोखा नवस, घोड्यावर बसून गेली देवीच्या दर्शनाला

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी माता वैष्णो देवीच्या दरबारात जाऊन नतमस्तक झाली.

शिल्पाचा पतीसाठी अनोखा नवस, घोड्यावर बसून गेली देवीच्या दर्शनाला

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी माता वैष्णो देवीच्या दरबारात जाऊन नतमस्तक झाली. पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून शिल्पा शेट्टी या दिवसात खूपच त्रस्त आहे, अशा परिस्थितीत शिल्पा राज आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी नवस मागण्यासाठी वैष्णो देवीला पोहोचली आहे. येथे पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात ती दर्शनासाठी घोड्यावर बसून निघून गेली. तिच्यासोबत पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. प्रवासादरम्यान शिल्पाने 'जय माता दी' चा जपही केला. दर्शन घेतल्याने खूप आनंद झाल्याचं यावेळी शिल्पाने म्हटलं. 

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा बुधवारी जम्मू -काश्मीरच्या कटरा येथे दिसली. माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी अभिनेत्री कटरा येथे पोहोचली होती. यादरम्यान शिल्पा शेट्टी घोड्यावर स्वार होताना दिसली. शिल्पा शेट्टी मंदिराच्या आवारात इतर भक्त आणि माध्यमांशी संवाद साधताना दिसली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जम्मू -काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिराला भेट देण्यासाठी त्यांनी 13 किमीचा प्रवास केल्याचे सांगितले जात आहे.

शिल्पा शेट्टीचा देवांवर पूर्ण विश्वास आहे. अलीकडेच तिने दरवर्षी प्रमाणे आपल्या घरी बाप्पाची पुजा केली. शिल्पाचा पती राज कुंद्रा आजकाल तुरुंगात आहे. पॉर्न फिल्म बनवून अॅपवर स्ट्रीम केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली.

Read More