Marathi News> मनोरंजन
Advertisement

जेव्हा पाकिस्तानी शत्रूनं कॅप्टन विक्रम बत्रांना 'माधुरी हमें दे दे' म्हणत चिथवलं...

पाकिस्तानच्या बाजुनं एकाने गोळीबार सुरु असतानाच....

जेव्हा पाकिस्तानी शत्रूनं कॅप्टन विक्रम बत्रांना 'माधुरी हमें दे दे' म्हणत चिथवलं...

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा (shershah movie) 'शेरशाह' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि सेलिब्रिटींची चांगलीच पसंती मिळत आहे. कारगिल युद्धातील हिरो, कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे. 

या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या एक दृश्यानुसार, पाकिस्तानी बाजूकडून एकानं शेरशाहला उद्देशून म्हटलेलं, 'माधुरी दीक्षित हमें दे दे', आणि मग.... 

Video : बाबो....! आज मै उपर, आसमाँ नीचे...; Burj Khalifa च्या टोकावर जाऊन 'या' महिलेची कमाल

 

'माधुरी दीक्षित हमें दे दे'
कारगिल युद्धामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांना पॉईट 5140 वर विजय मिळवल्यानंतर लेफ्टनंट पदावरुन कॅप्टन पदावर बढती देण्यात आली होती. ज्यानंतर पॉईंट 4875 पुन्हा भारताच्या ताब्यात आणण्यासाठीची जबाबदारी त्यांनी टीम डेल्टासोबत आपल्या खांद्यावर घेतली. त्याचवेळी पाकिस्तानच्या बाजुनं एकाने गोळीबार सुरु असतानाच 'अबे माधुरी दीक्षित हमें दे दे, अल्लाह की कसम हम सब यहां से चले जाएंगे... ', असं म्हटलं होतं. 

आपल्याला चिथवलं जात असल्याचं पाहून विक्रम बत्रा यांनी पाकिस्तानच्या या उद्दामपणाला उत्तर देत म्हटलेलं, 'माधुरी दीक्षित तो दूसरे टाइप की शूटिंग में बिजी हैं, फिलहाल इससे काम चला लो'. असं म्हणत विक्रम बत्रा यांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवत त्यांना धडा शिकवला होता. शिवाय ज्यानं माधुरीबाबत हे वक्तव्य केलं होतं, त्याला गोळी मारण्यापूर्वी, 'ले बेटा माधुरी दीक्षित का तोहफा' म्हणत कंठस्नान घातलं होतं. 

Read More