Marathi News> मनोरंजन
Advertisement

एअरपोर्टवर सुटला चाहत्याचा ताबा, शहनाज गिलसोबत घडला धक्कादायक प्रकार

नक्की शहनाज गिलसोबत काय झालं पाहा...

एअरपोर्टवर सुटला चाहत्याचा ताबा, शहनाज गिलसोबत घडला धक्कादायक प्रकार

मुंबई : पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळख असणारी अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शहनाजचे लाखो चाहते आहेतय 'बिग बॉस 13' शोमध्ये असलेल्या तिच्या निरागसपणानं सगळ्यांच्या मनावर छाप सोडली होती. तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शहनाज गिलसोबत एक चाहता फोटो काढायला येतो आणि त्यानंतर त्यानं असं काही कृत्य केलं की शहनाजनं त्याला टोमणा मारला आहे. (Shehnaaz Gill Viral Video)

आणखी वाचा : बापरे... गेली 9 वर्षे राधिका आपटे... ; 12 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात तिनं हेही दिवस पाहिले

शहनाजचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ती पापाराझींसाठी पोझ देत असताना तिच्या मागून एक चाहता येतो आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे येतो. त्यावेळी चुकून तो शहनाजच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्यानं हात ठेवताच शहनाज मागे सरकते. 

आणखी वाचा : Amitabh Bachchan वाढदिवसाच्या निमित्ताने समोर आणणार स्वत:बाबतचं सर्वात मोठं गुपित

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बातमीची लिंक : ...म्हणून नशेच्या आहारी गेली होती पूजा भट्ट

शहनाजनेही इतरांसोबतही फोटो काढलेत आणि जेव्हा ती तेथून निघाली तेव्हा ती त्या चाहत्याला म्हणाली की तुला काय वाटलं तुझा मित्र आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ती स्वत: ला योग्य प्रकारे सांभाळते. दुसरा नेटकरी म्हणाला, खरंच काही चाहते मूर्ख असतात. (Shehnaaz Gill Weired Reaction After Fan Wanted To Put His Hand On Her Shoulder Watch Viral Video) 

आणखी वाचा : 'ढोंगी', इराणी महिलांना पाठिंबा दिल्यामुळे प्रियांका चोप्रा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

शहनाजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. आता ती सुपरस्टार सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान'मध्ये दिसणार आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय पलक तिवारी, सिद्धार्थ निगम आणि राघव जुयाल हे देखील यात दिसणार आहेत.

Read More