Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सना तू पुन्हा रडवलस...', Shehnaaz Gill चा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Shehnaaz Gill: हा व्हिडीओ पाहिलावर नेटकऱ्यांना सिद्धार्थ शुक्लाची (Siddharth Shukla) आठवण आल्याशिवाय राहत नाही. 

'सना तू पुन्हा रडवलस...', Shehnaaz Gill चा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Shehnaaz Gill: शहनाज गिल पुन्हा एकदा सोशल मीडियावर (social media) चर्चेत आली आहे. यंदा ती सिद्धार्थ शुक्लासंदर्भातील बातमीने नाही तर  शहनाजने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 


पण हा व्हिडीओ पाहिलावर नेटकऱ्यांना सिद्धार्थ शुक्लाची (Siddharth Shukla) आठवण आल्याशिवाय राहत नाही. शहनाज गिल या व्हिडीओमध्ये 'अय्यारी' (Ayyari) या चित्रपटातील 'लै डूबा' हे गाणं गाताना दिसतं आहे. (shehnaaz gill sang the song ishq tera lai duba viral Video on social media)

'सना तू पुन्हा रडवलस...'

शहनाज गिलच्या या गाण्याला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. त्यांना शहनाजचा आवाज खूप आवडला आहे. आतापर्यंत तिच्या या व्हिडीओला 9 लाखापेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. शहनाज गिल 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू करणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 

 

Read More