Marathi News> मनोरंजन
Advertisement

RAGHAV JUYALसोबत अफेअरच्या चर्चा, SHEHNAAZ म्हणते, 'लोग हमसे जलते हैं'..पाहा VIDEO

या गाण्याचे बोल जर आपण ऐकले तर शेहनाजला कोणाला टोमणा मारायचा आहे का असचं दिसत आहे.

RAGHAV JUYALसोबत अफेअरच्या चर्चा, SHEHNAAZ म्हणते, 'लोग हमसे जलते हैं'..पाहा VIDEO

Bigg Boss 13 या रिअॅलिटी शोमधून प्रकारशोतात आलेल्या आणि पंजाबी चित्रपट जगतामध्ये कतरिना कैफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री शहनाज गिलचा (shehnaaz gill) चाहता वर्ग बराच मोठा होता . दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत असमणारी तिची खास मैत्री सर्वांनाच हेवा वाटण्याजोगी होती.

त्याच्या निधनानंतर शहनाजच्या वाटेत बऱ्याच अडचणी आल्या. पण, आता मात्र ती या अडचणींवर मात करुन वाट पुढे चालताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ती सध्या सेलिब्रिटी होस्ट आणि डान्सर, राघव जुयालला डेट करत आहे.

सध्यातरी ही जोडी त्यांचं हे नातं सर्वांसमोर आणू इच्छित नाही. परिणामी योग्य वेळेच्या प्रतिक्षेत असल्यामुळं ते दोघंही नातं लपवताना दिसत आहेत. (Actress shehnaaz gill said to be dating raghav juyal keeps relationship secret)

पत्रकार परिषदेत याविषयी प्रश्न विचारता शहनाजनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.(Shehnaaz Gill Break Silence On Dating Rumours With Raghav Juyal Watch Video)

 पण नुकतंच शेहनाज ने एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे यात तिने एक गाणं गायलं आहे या गाण्याचे बोल जर आपण ऐकले तर शेहनाजला कोणाला टोमणा मारायचा आहे का असचं दिसत आहे.. नेहा कक्कड(NEHA KAKKAD) च्या 'लोग हमपे जलते है' या गाण्यावर शेहनाज ने हा व्हिडीओ बनवला आहे यांनतर एकच चर्चा आता होताना दिसत आहे.

 

 

Read More