Marathi News> मनोरंजन
Advertisement

ईदच्या पार्टीत सलमानला 'तिने' खेचत नेलं...भाईजाननं मग थेट घरीच पाठवलं

शहनाज आणि सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये शहनाज ईदच्या पार्टीत सलमान खानचा हात खेचताना दिसत आहे.

ईदच्या पार्टीत सलमानला 'तिने' खेचत नेलं...भाईजाननं मग थेट घरीच पाठवलं

मुंबईः सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माने ईदच्या निमित्ताने तिच्या घरी एका ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलिवूडमधील सर्वच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, शहनाज गिल सर्वाधिक चर्चेत राहिली. या पार्टीत शहनाज गिल अतिशय सुंदर काळा सूट घालून पोहोचली होती. या पार्टीतील शहनाजचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या पार्टीत शहनाज गिलने सलमान खानसोबत सर्वाधिक धमाल केली. शहनाज आणि सलमान एकमेकांना मिठी मारताना आणि खूप बोलतांना दिसले.शहनाज आणि सलमानमधील हे बाँडिंग सगळ्यांनाच आवडले आहे.शहनाज आणि सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये शहनाज ईदच्या पार्टीत सलमान खानचा हात खेचताना दिसत आहे.

अशा परिस्थितीत सलमान शहनाजचे लाड करताना दिसतो आणि तिला गाडीत सोडायलाही जातो. नंतर तो अर्पिताच्या घरी परत जातो. सोशल मीडियावर शहनाजचा एक व्हिडिओ समोर आला असून, शहनाज फोटोग्राफर्सना सलाम करताना दिसत आहे. शहनाज गिल यावेळी पारंपरिक ब्लॅक कलरच्या पोशाखात दिसली.

विशेष म्हणजे शहनाज गिल सलमान खानच्या 'कभी ईद, कभी दिवाळी' या चित्रपटात दिसणार आहे. सलमान खानला बिग बॉस सीझन 13 मधील शहनाज गिलचा बबली स्वभाव आवडला होता.

Read More