Marathi News> मनोरंजन
Advertisement

सांगायलाही किळस वाटते, बाजारात एका व्यक्तीनं...; Shefali Shah चा मोठा खुलासा

Shefali Shah says someone Touched her Inappropriately In Market : शेफाली शाहनं तिच्यासोबत बाजारात घडलेल्या या वाईट घटनेविषयी सांगितलं. त्यानंतर तिला कसं वाटलं होतं. इतकंच काय तर त्या सगळ्याचा एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम होतो हे सांगितलं आहे. 

सांगायलाही किळस वाटते, बाजारात एका व्यक्तीनं...; Shefali Shah चा मोठा खुलासा

Shefali Shah says someone Touched her Inappropriately In Market : बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाह (Shefali Shah) ही विविध धाटणीच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. दिल्ली क्राइम असो किंवा मग डार्लिंग्स सगळ्यात शेफालीनं दमदार अभिनय केला आहे. शेफालीला तिचं खासगी आयुष्य हे खासगीच ठेवायचं असतं. ती खूप कमीवेळा तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलते. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शेफालीनं तिला आलेला एक वाईट अनुभव सांगितला आहे. सार्वजनिक ठिकाणी कशाप्रकारे एका व्यक्तीनं तिला चुकीच्या प्रकार स्पर्श केला होता. त्याची आजही तिला किती लाज वाटते हे शेफालीनं सांगितलं.  

शेफालीनं एएनआय पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. स्मिता प्रकाश यांच्याशी बोलताना त्या एपिसोडमध्ये शेफालीनं मीरा नायर यांच्या 'मॉनसून वेडिंग' मध्ये तिच्या पर्फॉर्मन्स विषयी सांगितलं. चित्रपटात तिनं रिया वर्मा ही भूमिका साकारली होती. रियाचं लहाणपणी लैंगिक शोषण झालं होतं. शेफालीनं यावेळी तिचा अनुभव सांगितला की 'जसं मी आधी सांगितलं. प्रत्येक व्यक्ती या सगळ्याला सामोरं गेली आहे. मला आठवतं की जेव्हा मी बाजारात गेली होती. बाजार म्हटलं की गर्दी ही असणारच तेव्हा एका व्यक्तीनं मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला होता. तेव्हा मला खूप घाणं वाटलं. मी कधीच काही म्हणाले नाही कारण मला खूप लाज वाटत होती.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्मिता पुढे म्हणाल्या, 'हे सगळं होण्यासाठी तू कारणीभूत आहेस? असा प्रश्न पडला का. त्यावर उत्तर देत शेफाली म्हणाली, हो. तुझ्याप्रमाणेच इतरांनी देखील हा प्रश्न विचारला होता. आपल्याला आपण दोषी आहोत असं वाटू लागतं. लाज वाटू लागते. आपण त्यावर बोलत नाही, खरं सांगायचं झालं तर मला नाही वाटतं की मी यावर जास्त विचार केला असेल, की या गोष्टीवर बोलणं योग्य ठरेल.' 

हेही वाचा : Gautami Patil ला करायचं आहे लग्न, म्हणाली 'मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा...'

'मॉनसून वेडिंग' या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, लिलेट दुबे, वसुंधरा दास, विजय राज, रजत कपूर, रणदीप हुड्डा आणि सोनी राजदान यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. शेफालीच्या करिअर विषयी बोलायचे झाले तर तिनं 'रंगीला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर 1998 मध्ये सत्या या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटासाठी तिला बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार देखील मिळाला होता. याशिवाय 'गांधी माय फादर', 'दिल धडकने दो', 'ब्रदर्स', 'द जंगल बुक' आणि 'कमांडो 2' या चित्रपटांमध्ये देखील ती दिसली होती. 

Read More