Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या 'स्त्री' सिनेमाचा फर्स्ट लूक

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर स्त्री सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

व्हिडिओ : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या 'स्त्री' सिनेमाचा फर्स्ट लूक

मुंबई : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर स्त्री सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यात श्रद्धा कपूर ननच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा एकंदर लूक पाहता तिची व्यक्तीरेखा ही हॉलिवूडचा हॉरर सिनेमा कंज्युरिंग वरुन प्रेरित झालेला तर नाही ना? असे वाटते. कंज्युरिंग सिरीजचा आगामी सिनेमा द नन देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. यातील अभिनेत्रीही ननच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

स्त्री हा सिनेमा हॉरर नसून हा हॉरर कॉमेडी ड्रामा आहे. या सिनेमाचा टीझर आऊट झाला असून यात काही हॉरर सीन्स पाहायला मिळाले होते. 

या सिनेमाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले असून हा सिनेमा ३१ ऑगस्टला प्रदर्शित होईल. तर मॅडॉक फिल्म्सने सिनेमाची निर्मिती केली आहे. याचे निर्माते दिनेज विजान यांनी सांगितले की, राजकुमार रावसोबत काम करण्यासाठी श्रद्धा खूप उत्सुक होती. तसंच सिनेमाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मी पहिल्यांदाच हॉरर कॉमेडी करत आहे. खूप मज्जेशीर अनुभव होता आणि राजकुमार राव जबरदस्त अभिनेता आहे. त्याच्यासोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.

स्त्री शिवाय श्रद्धा कपूर सायना नेहवालच्या बायोपिकमध्येही काम करत आहे. तसंच ‘बत्ती गुल मीटर चालू’, ‘साहो’ हे सिनेमेही तिच्याकडे आहेत. तर राजकुमार राव ‘फन्ने खां’, ‘मेंटल है क्या’ आणि ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ या सिनेमांमध्ये व्यस्त आहे.
 
Read More