Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपूर कुटुंबियांच्या लेकानं वयाच्या 67 व्या वर्षी केलं शिक्षण पुर्ण; मिळवले इतके गुण

Shammi Kapoor Son News: सध्या चर्चा आहे ती म्हणजे दिग्गज अभिनेते शम्मी कपूर यांची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या त्यांची चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. नक्की काय केलंय त्यांनी चला पाहुया? 

कपूर कुटुंबियांच्या लेकानं वयाच्या 67 व्या वर्षी केलं शिक्षण पुर्ण; मिळवले इतके गुण

Shammi Kapoor Son News: वय हे फक्त एक नंबर आहे, असं आपण अनेकदा बोलतो. त्यातून शिक्षणालाही वयाचे बंधन नसते. त्यातून आपण आपल्या आवडत्या विषयात कधीही शिक्षण घेऊ शकतो. अशावेळी आपल्याला फक्त गरज असते ती म्हणजे योग्य मार्गदर्शन याची आणि जिद्दची. सध्या अशाच एका बड्या अभिनेत्याच्या मुलाची चर्चा आहे ज्यानं उतारवयात आपलं शैक्षणिक ध्येय हे पुर्ण केलेलं आहे. त्यांनी वयाच्या 67 व्या आपल्या आवडत्या विषयात पदवी घेतली आहे. हे कपूर कुटुंबियातील सदस्य आहेत. 

कपूर कुटुंबियांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. सध्या याच कुटुंबातील एक सदस्यानं वयाच्या 67 व्या वर्षी पदवी संपादन केली आहे. त्यामुळे त्याची सध्या चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांनी फार चांगली कामगिरी केली आहे. त्यानं यावेळी पदवी मिळवली असून आता ते एम.एची तयारी करणार आहेत. राज कपूर यांचे भाऊ शम्मी कपूर यांचा मुलगा आदित्य राज कपूर यांनी वयाच्या 67 व्या वर्षी पदवीचं शिक्षण पुर्ण केले आहे. शम्मी कपूर आणि गीता बाली यांचे ते पुत्र आहेत. त्यांनी फिलोसॉफी म्हणजेच तत्वज्ञान या विषयात पदवी प्रदान केली आहे. यावेळी त्यांनी सगळं श्रेय हे आपल्या मुलीला दिलं आहे. 

हेही वाचा : OMG 2 मधील दमयंती कोण तुम्हाला माहितीये? कोर्टात हस्तमैथूनचा धडा देत केली सगळ्यांची बोलती बंद

ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले आहेत की, अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे सर्व संधी या उपलब्ध होत्या परंतु त्याचा मी अजिबातच लाभ घेतला नाही. वयाच्या 61 व्या वर्षी मी अभ्यास करण्यास सुरूवात केली आणि तत्त्वज्ञान या विषयात वळलो. त्यातून अध्यात्मिक गोष्टींकडे माझा जास्त कल होता. तो विषय मी सहज निवडला. मी निवृत्त आहे. त्यामुळे माझ्याकडे बराच वेळ आहे तेव्हा माझ्या मुलीला वाटायचं की मी माझा हा वेळ सत्कारणी लावावा. तेव्हा तिनंच मला इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतून ऑनलाईन कॉर्स करण्यास प्रोत्साहन केले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करोनाच्या काळात त्यांना अनेक परीक्षा या चुकवाव्या लागल्या. त्यांनी यावेळी अखेर 59.67 टक्के मिळवत पदवी प्राप्त केली आहे. आता ते पुढेही शिकणार आहेत आणि त्यांनी मास्टर्ससाठीही प्रवेश घेतला आहे. आदित्य हे अभिनय क्षेत्रातही कार्यरत होते. आदित्य हे नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आई गीता बाली यांचे निधन झाले. मग शम्मी कपूर यांनी नीला देवी यांनी त्यांचा सांभाळ केला. 

Read More