Marathi News> मनोरंजन
Advertisement

#ShameonMumbaiPolice म्हणत कंगनाने विचारले ५ महत्वाचे प्रश्न

कंगनाचा रिया चक्रवर्तीवर आरोप 

#ShameonMumbaiPolice म्हणत कंगनाने विचारले ५ महत्वाचे प्रश्न

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडच्या नेपोटिझमवर जोरदार चर्चा रंगली. यामध्ये कंगना रानावतने कायमच हा मुद्दा उचलून धरला. कंगनाने या प्रकरणात अनेकांवर आरोप केले आहेत. करण जोहर, यशराज फिल्म या सगळ्यांसोबतच आता कंगनाने चक्क मुंबई पोलिसांवर आरोप करत पाच प्रश्न विचारले आहेत. 

कंगनाने ट्विटर अकाऊंटवर #ShameonMumbaiPolice या हॅशटॅगखाली मुंबई पोलिसांना ५ प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

१. यशराज फिल्मने सुशांत सिंह राजपूतला बॅन का केले?
२. करण जोहरने सुशांतला ट्रायलॉजीचे वचन देऊन सिनेमा ऑनलाईन का टाकला? 
३. माफिया मीडियाने सुशांत ड्रगिस्ट, रेपिस्ट असून फ्लॉप अभिनेता असल्याचं का चित्र उभं केलं? 

४. रिया चक्रवर्तीने सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या आजारपणाबद्दल कधी काही सांगितलं का नाही? 

५. सुशांतला काऊन्सिल करायला रियाने त्याच्या कुटुंबियांना न बोलवता महेश भट्ट यांना का बोलावलं? 

कंगनाने विचारलेल्या या प्रश्नांमुळे हे प्रकरण थांबायचं नाव घेत नाही. एवढंच नव्हे तर सुशांतच्या कुटुंबियांनी देखील रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

Read More